शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आज बाल कर्करोग निवारण दिन; ‘टाटा’त दरवर्षी २,८०० बाल कर्करोगग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 09:54 IST

प्रौढांपेक्षा बालकांवर कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात

स्नेहा मोरे

मुंबई : मागील काही वर्षांपासून टाटा रुग्णालयात बाल कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. लोकसंख्येची वाढती घनता हे याचे मुख्य कारण असल्याचे टाटा रुग्णालयातील बाल कर्करोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. टाटा रुग्णालयात दरवर्षी १५ वर्षांखालील २,८०० नवीन रुग्ण दाखल होतात, तर अठरा वर्षांखालील नवीन बाल कर्करोग रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

प्रौढांपेक्षा बालकांवर कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात, मात्र केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेळीच निदान झाल्यास लहान मुलांमधील कर्करोग बरा होऊ शकतो.

कर्करोग शरीराच्या ज्या स्थानी निर्माण होतो त्यानुसार लक्षणे निर्माण होतात. त्यासाठी शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी या चिकित्सा पद्धतींच्या साहाय्याने या कर्करोगाची चिकित्सा केली जाते. मुलांमधील कर्करोगावर उपचार करताना रुग्णालयामध्ये आता इम्युनथेरपीचा वापर प्रभावीरीत्या केला जात आहे. यामध्ये मुलांमध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. पहिल्या पाच वर्षांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवला नाही तर मूल कॅन्सरमुक्त झाल्याचे वैद्यकीय निदान करण्यात येते, असे टाटा मेमोरिअलचे बाल कर्करोग विभागाचे तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले.

ल्युकेमियाचे ५० टक्के रुग्ण मुलांमध्ये ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे इत्यादी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित  बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो.  याव्यतिरिक्त मेंदूचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असा इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो.

टॅग्स :cancerकर्करोग