शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

त्वचा सुंदर बनविण्यासाठी टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 06:41 IST

जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ तुम्ही, आम्ही आणि सर्व जण हा दिवस आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तींसोबत साजरा करतो. त्यांना छान वाटणा-या विशेष गोष्टी करतो.

- अमित सारडाजगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ तुम्ही, आम्ही आणि सर्व जण हा दिवस आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तींसोबत साजरा करतो. त्यांना छान वाटणा-या विशेष गोष्टी करतो. तुम्ही या दिवशी स्वत:वरही प्रेम करून स्वत:बद्दल छान वाटायला हवे, यासाठी तुमच्या त्वचेची थोडीशी काळजी घेतली, तिच्यावर प्रेम केले, तर त्वचेलाही पुन्हा तारुण्याची भेट बहाल होईल.मेकअप प्रायमरचा वापर करातुम्ही मेकअप करणार असाल, तर तो करण्याच्या आधी आॅलिव्ह आॅइलचा वापर नैसर्गिक मेकअप प्रायमर म्हणून करा. त्यामुळे तुमची त्वचा आर्द्र राहील आणि तिला आतून पोषण मिळेल.कसा वापर करावा -मेकअप करण्याच्या आधी आॅलिव्ह आॅइलच्या काही थेंबांनी चेहºयाला मसाज करा. त्यामुळे त्वचा आणि मेकअप यांच्या दरम्यान एक संरक्षक भिंत तयार होईल. मेकअपमध्ये वापरण्यात येणारे रसायन त्वचेसाठी कधी-कधी हानिकारक ठरते. आॅलिव्ह आॅइल त्वचेचे अतिरिक्त नुकसान होण्यापासून बचाव करते.नैसर्गिक सनस्क्रीनचा वापरसूर्याच्या किरणांमुळे होणारे हानिकारक परिणाम लगेच जाणवत नाहीत. मात्र, दीर्घकाळाचा विचार केला, तर त्वचेला नुकसान होत राहते. हळूहळू चेहºयावर पडणाºया सुरकुत्या, रेषा, डाग हे सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे होणारे परिणाम आहेत. त्यामुळे सनस्क्रीन वापरणे अत्यावश्यक आहे. मात्र, रसायनांचा समावेश असणारे लोशन अथवा स्क्रीन नसावे. तिळाचे तेल नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून उत्तम आहे. कारण त्यात असलेल्या एसपीएफमुळे सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून रक्षण होते.कसा वापर करावा - प्रखर उन्हात बाहेर पडण्याआधी तिळाच्या तेलाचे काही थेंब त्वचेवर लावावे.नैसर्गिक मेकअप रिमूव्हरमेकअप काढणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्वचेच्या रंध्रांना श्वास घेणे आवश्यक असते. दीर्घकाळापर्यंत मेकअप चेहºयावर ठेवल्यास, ही रंध्रे बंद होतात आणि परिणाम म्हणून पुरळ अथवा डागांची समस्या उद्भवते. जोजोबा आॅइल उत्तम क्लेन्जर म्हणून ओळखले जाते.कशा प्रकारे वापर करावा - कापसाच्या बोळ्याने जोजोबा आॅइलचे काही थेंब चेहºयावर लावून मेकअप काढावा. हे आॅइल उत्तम क्लेन्जर असून, त्वचेत राहिलेले मेकअपचे कण खोलवर शिरून काढते.(ब्युटी अँड वेलनेस एक्स्पर्ट)