मुंबईतील तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी २३ दिवसांत तिसरी हृदयप्रत्योपण शस्त्रक्रिया
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
मुंबई: मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अवघ्या २३ दिवसांत मुंबईत तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार, २६ ऑगस्टला झाली. हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन ४९ वर्षीय रुग्णाचा जीव करून वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात ४९ वर्षीय रुग्ण अक्युट कार्डिओमायोपॅथीने आजारी असल्यामुळे दाखल झाला होता. या रुग्णाची ...
मुंबईतील तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी २३ दिवसांत तिसरी हृदयप्रत्योपण शस्त्रक्रिया
मुंबई: मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अवघ्या २३ दिवसांत मुंबईत तिसरी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार, २६ ऑगस्टला झाली. हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन ४९ वर्षीय रुग्णाचा जीव करून वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात ४९ वर्षीय रुग्ण अक्युट कार्डिओमायोपॅथीने आजारी असल्यामुळे दाखल झाला होता. या रुग्णाची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर उपचार म्हणजे हृदयप्रत्यारोपण हाच होता. एक ६२ वर्षीय रुग्ण हा रुग्णालयात दाखल होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर त्याच्या नातेवाईकाने अवयवदानासाठी परवानगी दिली. यावेळी त्या रुग्णाचे हृदयदान करण्याचाही निर्णय नातेवाईकांनी घेतला. फोर्टिस रुग्णालयातच दाखल असलेल्या ४९ वर्षीय रुग्णाला हृदयाची गरज होती. ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर सकाळी ९ वाजून ४१मिनीटांनी ६२ वर्षीय रुग्णाचे हृदय काढण्यात आले. आणि ९ वाजून ४६ मिनीटांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. २ तास ४९ मिनीटे वेळात हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. यामुळे ४९ वर्षीय रुग्णास नवसंजीवनी मिळाली. ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अवयवदानात हृदयदान देखील करता येते, याची जनजागृती होत असल्याचे हे एक उदाहरण आहे. कुटुंबियांचा मी आभारी आहे. त्यांनी हृदयदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच मी तिसर्या रुग्णाचा जीव वाचवू शकलो. हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पुढचे ४८ ते ७२ तास रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यता आले आहे, असे कार्डिएक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी).................(चौकट)एका वृद्धाने दिले चौघांना जीवनदानबुधवारी ६२ वर्षीय रुग्णालाय ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे चौघाजणांना जीवनदान मिळाले आहे. हृदयाच्या बरोबरीनेच दोन किडनी आणि यकृत दान करण्यात आले. एक किडनी आणि यकृत फोर्टिस रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले असून किडनी लिलावती रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आली आहे.