शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आॅफिसात कूल-कूल राहण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 13:50 IST

‘वर्किंग वूमन’ला शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ही ऊर्जाच महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. आॅफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स

बऱ्याचदा ‘वर्किंग वूमन’ला आॅफिसातील कामाचा प्रचंड व्याप, तेथील पॉलिटिक्स, सहकाऱ्याचे हेवे-दावे, आॅफिसीयल टार्गेट आदी समस्यांमध्ये ती अडकलेली असते. शिवाय तिला घरदेखील सांभाळावे लागते. हे सर्व करताना महिलांना शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ही ऊर्जाच महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. आॅफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स-* आपले मन प्रसन्न होईल, अशा काही वस्तू आपल्या डेस्कवर ठेवल्या पाहिजेत. पंधरा दिवसातून त्या चेंज केल्या पाहिजेत.  * आॅफिसात जाताना एखाद्या दिवशी आपल्या बालपणीचे काही फोटो घेऊन जा. दुपारच्या लंच ब्रेकदरम्यान ते आपल्या सहकाऱ्याना दाखवा. यामुळे तुम्हाला व आपल्या सहकाऱ्याना बालपणीचे दिवस आठवतील. असे केल्याने नक्कीच तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा ठरेल. * कार्यालयातील काही सहकारी मिळून एक ग्रुप तयार करावा. कार्यालयीन वेळ सोडून एकत्र येऊन एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी हा ग्रुप उपयोगी ठरु शकतो. * कामातून थोडा वेळ काढून आॅफिसमधील प्रत्येक क्यूबिमध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्याना हाय-हॅलो केले पाहिजे. त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते तसेच कामात मनही लागते. * आॅफिसच्या पॉलिटिक्समध्ये चुकूनही भाग घेऊ नका. त्यातून तुम्हाला मनस्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एका सहकाऱ्याची गोष्ट दुसऱ्या सहकाऱ्याला सांगू नका. * आॅफिसात कुणाशी वाद करु नका. सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासले पाहिजेत. घरच्या गोष्टीचा आॅफिस कामावर व आॅफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेऊन मन लावून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.