शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान प्रक्रियेत आता पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची; पोलिस यंत्रणेच्या समावेशासाठी प्राधिकार समितीचे पत्र

By स्नेहा मोरे | Updated: December 16, 2022 07:49 IST

- स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कामा व आल्ब्लेस रुग्णालयात अवयव दानाशी संबंधित कार्यरत मानवी अवयव प्राधिकार समितीने ...

- स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कामा व आल्ब्लेस रुग्णालयात अवयव दानाशी संबंधित कार्यरत मानवी अवयव प्राधिकार समितीने सात महिन्यांत अवयवदानासंबंधित ४० प्रकरणे हाताळली आहेत. यात ६५ आणि ७१ वर्षीय रुग्णाच्या अवयवदानासाठी विशेष मंजुरी देण्यात आली. गुन्ह्यांचे नवे प्रकार लक्षात घेता भविष्यात या अवयव प्राधिकार समितीत पोलिस यंत्रणेची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या समावेशासाठी समितीच्या अध्यक्षांनी थेट पोलिसांनाच पत्र लिहिले आहे.

अवयव मिळविण्यासाठी प्रलोभन दाखविणे किंवा त्यावर दडपण आणणे, बळजबरी करणे या सर्व गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. समितीच्या वतीने अवयव दाता व अवयव भोक्ता, त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून मगच त्या शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात येते. कामा व आल्ब्लेस रुग्णालयांतर्गत दक्षिण मुंबई तसेच सीएसएमटी ते सायन व चेंबूर आणि चर्चगेट रेल्वे स्टेशन ते माहीम हा परिसर येतो. समितीचे अध्यक्ष कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, या समितीअंतर्गत काम करताना वैद्यकीय तज्ज्ञांप्रमाणे पोलिस यंत्रणाही आवश्यक असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा असल्यास आणखी पारदर्शक आणि अधिकृत पडताळणी करता येईल, त्यासाठी पोलिस यंत्रणेला पत्र देण्यात आले आहे.

समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. पालवेसमितीच्या अध्यक्षस्थानी कामा व आल्बलेस रुग्णालयाचे  अधीक्षक डॉ. तुषार पालवे असून, समिती सदस्यांमध्ये १ सहयोगी प्राध्यापक, १ मायक्रोबायोलॉजी प्राध्यापक, २ आयएमए सदस्य आणि २ आरोग्य सेवा सदस्य आहेत. ही समिती कामा रुग्णालयात कार्यरत आहे. समितीने मागील सात महिन्यांत १४ यकृत आणि २६ मूत्रपिंड दान विषयक प्रकरणे हाताळली आहेत, ही सर्व प्रकरणे मुंबईतील आहेत.

टॅग्स :Organ donationअवयव दानPoliceपोलिस