शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आता मार्केटमध्ये मिळणार ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure; किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 11:49 IST

Omicron Testing Kit Omisure: ओमायक्रॉन टेस्ट किट  OmiSure ही टाटा मेडिकलने विकसित केली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात जवळपास पाच हजार रुग्ण आढळले आहेत. यातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे की, आता जर तुम्हाला ओमायक्रॉनची लागण झाली असेल, तर तुम्ही लगेच त्याची चाचणी करू शकता. दरम्यान, आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून ओमायक्रॉनची टेस्ट किट OmiSure मार्केट आणि दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे.

ओमायक्रॉन टेस्ट किट  OmiSure ही टाटा मेडिकलने विकसित केली आहे. आयसीएसआरद्वारे टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या ओमायक्रॉनच्या टेस्ट किट Omisure ला 30 डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली. Omisure टेस्ट किट अन्य RT-PCR टेस्ट किट प्रमाणेच कार्य करेल. या किटच्या सहाय्याने टेस्टसाठी नाक किंवा तोंडातून स्वॅब देखील घेतला जाईल. त्यानंतर टेस्टचा फायनल रिपोर्ट 10 ते 15 मिनिटांत येईल.

OmiSure टेस्ट किटची किंमतटाटा मेडिकलने OmiSure टेस्ट किटची किंमत प्रति टेस्ट 250 रुपये निश्चित केली आहे, जी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर टेस्ट किटपेक्षा स्वस्त आहे. मात्र, टेस्टसाठी प्रयोगशाळांकडून अतिरिक्त चार्ज आकारले जाऊ शकतात, कारण ही घरगुती टेस्ट नाही.

ही टेस्ट घरी करता येत नाहीतुम्ही या किटसह घरी चाचणी करू शकत नाही, त्यामुळे प्रयोगशाळेत चार्ज स्वतंत्रपणे आकारले जाऊ शकते. टाटा एमडीची सध्या दरमहा 200000 टेस्ट किट तयार करण्याची क्षमता आहे. कंपनी ते परदेशात विकण्याचा विचार करत आहे आणि युरोपियन युनियन आणि यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला आहे.

ओडिशाने पाच लाख टेस्ट किट्सची दिली ऑर्डरओडिशा स्टेट मेडिकल कार्पोरेशन लिमिटेड (OSMCL) ने पाच लाख Omisure RT-PCR किट्सची ऑर्डर दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सॅम्पलध्ये ओमायक्रॉन शोधण्यासाठी Omisure ची ऑर्डर देणार ओडिशा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनTataटाटाcorona virusकोरोना वायरस बातम्या