शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेताय? एकदा ही माहिती वाचा आणि विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 10:38 IST

आधुनिक युगात आजही महिलांच्या मासिक पाळीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. सुशिक्षित महिलांमध्येही याविषयी पुरेशी जागरुकता नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

मुंबई : 

आधुनिक युगात आजही महिलांच्या मासिक पाळीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. सुशिक्षित महिलांमध्येही याविषयी पुरेशी जागरुकता नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यातच उत्सव काळात मासिक पाळी पुढे ढकलण्याकडेच अनेक महिलांचा कल असतो. मात्र, या गोळ्यांचे दुष्परिणाम शरीरावर संभवतात, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

मासिक पाळीबद्दल जनजागृती व्हावी यासाठी राज्यात अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. गणेशोत्सवाच्या आधी मासिक पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानेच घ्याव्यात. काही महिलांच्या बाबतीत रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या गोळ्या दीर्घकाळपर्यंत घेऊ नयेत. अन्यथा पाळीचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते.- डॉ. आरती अढे, स्त्रीरोगतज्ज्ञ, हिंदुजा हॉस्पिटल.

गोळ्यांमध्ये प्रोजेस्ट्रोन : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्यावापरण्यात येतात त्यात प्रोजेस्ट्रोन नावाचे हार्मोन्स असते. या गोळ्या घेतल्याने गर्भाशयाजवळील आवरण पडू न देता ते लांबवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मासिक पाळी लांबली जाते. मासिक पाळी येण्याच्या चार ते पाच दिवस आधी या गोळ्या घेतल्या जातात.

पाळी वैद्यकीय कारणांसाठी पुढे ढकलण्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्या आहेत, त्या आम्ही देतो. मात्र, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणेच अपेक्षित असते. योग्य प्रमाणात घेतल्या तर त्या फायदेशीर ठरतात, अन्यथा दुष्परिणाम दिसून येतात.- डॉ. रोहन पालशेतकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, ऑपेरा हाऊस.

टॅग्स :medicineऔषधंmedicinesऔषधंMedicalवैद्यकीय