पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी

By Admin | Published: July 13, 2017 02:20 AM2017-07-13T02:20:08+5:302017-07-13T02:20:08+5:30

बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे माणूस अक्षरश: घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावू लागला आहे

Take care of the palms of the feet | पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी

पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी

googlenewsNext

- रीना चव्हाण
सुंदर दिसावे, ही प्रत्येकाची इच्छा असते; पण बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे माणूस अक्षरश: घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावू लागला आहे. या धावपळीच्या आयुष्यामुळे त्याला स्वत:कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. त्यातल्या त्यात वेळ काढून काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जातात. चेहऱ्याची काळजी घेतात; पण पायांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. विशेषत: पावसाळ्यात पाण्यामुळे पायांना भेगा पडणे, खाज येणे, अशा समस्यांना समोरे जावे लागते. पायाच्या तळव्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत जाणून घेऊ या.
बऱ्याच गृहिणी पायाच्या तळव्यांकडे दुर्लक्ष करतात. पायात चप्पल न वापरताच चालण्याने, सतत पाण्यात काम करण्याने तळवे खराब होऊन त्याला भेगा पडतात. बऱ्याचदा तर त्यातून रक्तसुद्धा येते. अशा वेळी उभे राहणे व चालणे अशक्य होते. त्यामुळे वेळीच पायाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. पायाचे तळवे स्वच्छ करून त्याची मालिश न केल्याने त्वचेला आवश्यक तेवढे आॅक्सिजन आणि रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील चमकसुद्धा कमी होते. तळवे स्वच्छ केल्याने त्याची निगा राखल्याने रक्तप्रवाह वाढून आॅक्सिजनचाही पुरवठाही चांगल्या प्रकारे होतो. दररोजच्या धावपळीमुळे वा कामाच्या दगदगीमुळे तळव्यांची विशेष काळजी घ्यायला जमत नसेल, तर निदान अंघोळीच्या वेळी तरी तळवे ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा. अंघोळ झाल्यानंतर तळव्यांना खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा, जेणेकरून शरीरात रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होईल. घरगुती उपायांद्वारे पायांची योग्य ती काळजी घेता येईल.
>पायाची स्वच्छता कशी करावी
स्क्रबिंग करा : भेगा पडलेल्या तळाव्यांना स्क्रबिंग केल्याने तळव्यांची डेडस्कीन जाऊन ते मुलायम होतात. स्क्रब करण्यापूर्वी पाय थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावेत.
खोबरेल तेल : घरगुती उपचार करायचे झाल्यास भेगा आणि रुक्ष तळव्यांना खोबऱ्याचे तेल लावावे. तळव्यांचा मुलायमपणा याने कायम राहतो. तसेच जंतूंच्या संक्रमणापासूनही तळवे सुरक्षित राहतात.
ग्लिसरीन : भेगा पडलेल्या तळव्यांसाठी ग्लिसरीन कोणत्याही वरदानाशिवाय कमी नाही. दररोज रात्री झोपताना ग्लिसरीन लावल्याने भेगा लवकर ठीक होतात. लिंबूमुळेसुद्धा डेडस्कीन जाऊन त्वचा मुलायम होते.

Web Title: Take care of the palms of the feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.