हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 15:58 IST
हिवाळ्यात बरेचजण थंडीपासून बचावासाठी घरातच बसलेले असतात. मात्र, काहीजण जर ट्रिपला जाण्याचे नियोजन करीत असतील तर त्यात वाईट काही नाही.
हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी!
हिवाळ्यात बरेचजण थंडीपासून बचावासाठी घरातच बसलेले असतात. मात्र, काहीजण जर ट्रिपला जाण्याचे नियोजन करीत असतील तर त्यात वाईट काही नाही. जर आपण विशेषत: अॅडव्हेन्चर ट्रिपचे नियोजन करीत असाल, तर ट्रिपला जाण्यापूर्वी काळजी घेणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. परिवार सोबतच असेल तर सावधानी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय आपण ट्रिप एन्जॉय करुच शकत नाही. अशी घ्या काळजी-* थंडीचा जास्त परिणाम कानांवर होतो. त्यामुळे कान अगोदर झाकले पाहिजे.* आपल्या मानेच्या अवतीभोवतीदेखील गरम शॉल किंवा स्कार्फ बांधा.* बाहेर फिरायला जाण्याअगोदर आपल्या हातावर ग्लोव्हज् परिधान करा.* पायात नेहमी बूट ठेवा. घराच्या बाहेर दुसऱ्या जागेवर साइट सीनसाठी बूट अपाल्यासाठी खूपच चांगले राहतील, कारण बुटांमुळे आपले पाय गरम राहण्यास मदत होईल. * गरम स्वेटर, थर्मो वेअर आणि ओव्हर कोट आपल्या बॅगेत अवश्य ठेवा आणि त्यांचा वापरही करावा. * मुलांसाठी जास्त कपडे नकोत मात्र गरम कपड्यांची कमी नको. * एक चांगला सन ग्लास, सनस्क्रीन लोशनदेखील सोबत अवश्य ठेवा.