शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चिकुनगुनियानंतर ३ महिने काळजी घ्या, अन्यथा मृत्यूचा असतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:58 IST

लॅन्सेटमध्ये संशोधन प्रसिद्ध

नवी दिल्ली : चिकुनगुनिया विषाणूची लागण झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यानंतर १० ते १५ दिवस नव्हे, तर तीन महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका असतो, असे नव्या अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

‘द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस’ या नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो डासांनी चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. या आजाराला सामान्यतः पिवळा ताप असेही म्हणतात.

संशोधक म्हणतात...बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात, पण तरीही चिकुनगुनिया हा आजार घातक ठरू शकतो. या संसर्गाची बहुतेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, परंतु २०२३ मध्ये जगभरात अंदाजे पाच लाख जणांना चिकुनगुनिया झाला, तर ४०० पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला.ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) चे प्राध्यापक आणि अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक ॲनी दा पायक्साओ क्रूझ म्हणाले की, १० कोटी ब्राझीलमधील नागरिकांच्या डेटाचा वापर करून संशोधकांनी चिकुनगुनियाच्या सुमारे दीड लाख प्रकरणांचे विश्लेषण केले. 

निष्कर्ष काय? लोकांना तीव्र संसर्गाचा कालावधी संपल्यानंतरही गुंतागुंत होण्याचा धोका तीव्र संसर्गाचा कालावधी लक्षणे दिसल्यानंतर १४ दिवसांचा असतो.पहिल्या आठवड्यात संक्रमित व्यक्तीचा मृत्यूचा धोका दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत आठ पटीने जास्त असतो. संक्रमित व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत गुंतागुंत होण्याचा धोका दुप्पट असतो.

चिकुनगुनिया का वाढतोय? हवामानातील बदल, शहरीकरण आणि वेगाने वाढणाऱ्या मानवी कारणांमुळे एडिसजन्य आजार वाढून इतर भागात पसरण्याचा धोका आहे. 

उपचार काय? विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली होती.