सुयश आणि सुरूची पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 04:51 IST
सुयश टिळक आणि सुरूची आडारकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे
सुयश आणि सुरूची पुन्हा एकत्र
सुयश टिळक आणि सुरूची आडारकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ही जोडी आता, मालिकेनंतर पुढच्या प्रवासासाठी तयार झाली आहेत. चाहत्यांची निराशा ओढवून न घेता सुयश व सुरूची ही दोघे ही पुन्हा एकत्र स्ट्रॉबेरी हे नाटकातून पाहायला मिळणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सने बोलताना सुयश म्हणाला, स्टॉबेरी हे नाटक प्रेम, स्पर्श, चांगले, वाईट भाव-भावना यावर आधारित ही प्रेमकहानी असणार आहे. हे नाटक आभिजीत झुंजावर यांनी दिग्दर्शन केले असून दत्ता पाटील यांनी लिहीले आहे. चला, तर सुयश टिळक व सुरूची आडारकर यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देउयात.