संशयास्पद फिरणारी महिला पोलिसांच्या ताब्यात संशयाने जिल्हा रुग्णालयात पुन्हा गोंधळ : अपहरणकर्त्या महिलेची साथीदार असल्याचा दावा
By admin | Updated: March 29, 2016 00:24 IST
जळगाव : जिल्हा रुग्णालयात बाळ पळविण्यासाठी फिरत असल्याच्या संशयावरून सुरक्षारक्षकांनी एका महिलेला पकडल्याने जिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी गोंधळ झाला. संशयास्पद फिरणार्या या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ५ मार्च रोजी एक महिन्याच्या बाळाचे ज्या महिलेने अपहरण केले होते त्या महिलेची ही साथीदार असल्याचा दावा अपहृत बाळाच्या आई-वडिलांनी केला आहे.
संशयास्पद फिरणारी महिला पोलिसांच्या ताब्यात संशयाने जिल्हा रुग्णालयात पुन्हा गोंधळ : अपहरणकर्त्या महिलेची साथीदार असल्याचा दावा
जळगाव : जिल्हा रुग्णालयात बाळ पळविण्यासाठी फिरत असल्याच्या संशयावरून सुरक्षारक्षकांनी एका महिलेला पकडल्याने जिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी गोंधळ झाला. संशयास्पद फिरणार्या या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ५ मार्च रोजी एक महिन्याच्या बाळाचे ज्या महिलेने अपहरण केले होते त्या महिलेची ही साथीदार असल्याचा दावा अपहृत बाळाच्या आई-वडिलांनी केला आहे. ५ मार्च रोजी एका अनोळखी महिलेने जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या बाळंतीण नसरीनबी फारुख खान (वय २२ रा.भिलपुरा, बालाजी पेठ) यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या एका महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला होता. त्यानंतर पुन्हा २४ मार्च रोजी राधिका बाळू कोळी (वय ३ वर्ष रा.लोहारा, ता.पाचोरा) या बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. बालिकेच्या आईच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला होता. याप्रकरणी संगीता गोकुळ चौधरी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तिच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटना ताज्या असतानाच २८ मार्च रोजी पुन्हा जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक सात व इतर भागात एक महिला संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्या वेळी सुरक्षारक्षक प्रमुख (इन्चार्ज) दीपक ठोसर यांनी महिलेची चौकशी केली. त्या वेळी तिने सांगितले की, माझे नातेवाईक येथे दाखल आहे, मात्र त्यांची नावे तिला सांगता आली नाही. त्यामुळे संशय बळावला व तिला रुग्णालयातील पोलीस चौकीत बसवून ठेवले. त्या वेळी जिल्हा पेठ पोलिसांनी तिची चौकशी करून तिला पोलीस ठाण्यात नेले. पुन्हा अपहरणाचा अफवा...या महिलेला पकडल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून पुन्हा लहान मुलाचे अपहरण होत असल्याची अफवा वार्यासारखी सर्वत्र पसरली व काही वेळातच गर्दी जमा झाली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी पोलीस चौकीचे दार लावून सदर महिलेची चौकशी केली. त्या वेळी काहिसी मनोरुग्ण असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलीस तिला सोबत घेऊन गेले. अपहरकर्त्या महिलेची साथीदार?...या प्रकारासंबंधी अपह्रत बाळाची आई नसरीनबी व वडील फारुख खान यांना या घटनेविषयी माहिती मिळताच तेही तेथे पोहचले. त्यावेळी नसरीनबी यांनी या महिलेला लगेच ओळखले व ज्या महिलेने बाळाचे अपहरण केले त्या महिलेसोबत ही महिलादेखील होती असा दावा केला.