शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केसगळतीमुळे त्रस्त आहात ? मग करा स्वस्तात मस्त हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 11:14 IST

सध्याच्या धकाधकीच्या महिला असो किंवा पुरुष दोघेही केसगळतीने त्रस्त असतात. त्यातच आता राज्यात अनेक ठिकाणी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात तर तुलनेने अधिकच केस गळतात असे अनेकांना जाणवले असेल.

सध्याच्या धकाधकीच्या महिला असो किंवा पुरुष दोघेही केसगळतीने त्रस्त असतात. त्यातच आता राज्यात अनेक ठिकाणी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात तर तुलनेने अधिकच केस गळतात असे अनेकांना जाणवले असेल. होय, ते खरेही आहे. थंडीमध्ये केसगळतीची समस्या जास्त भेडसावते. मात्र घाबरुन जाऊ नका कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ऋतुमानानुसार बदल करायला शरिरालाही थोडा वेळ लागणारच. तरी केस गळतीची समस्या अगदीच गंभीर असेल तर मात्र वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणेच उत्तम आहे. थंडीत केस गळण्याची कारणे काय ?हिवाळ्यात जशी त्वचा कोरडी पडते तसेच इतरही बदल शरिरात होत असतात. थंडी सुरु झाली की टाळू कोरडा होतो. परिणामी केसही हळूहळू कोरडे पडायला सुरुवात होते. केसांची मूळं कमकुवत होतात. यामुळेच केस गळण्यास सुरुवात होते. केसात जर खूप कोंडा होत असेल तर थंडीत ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे सलून किंवा पार्लरमध्ये जाऊन महागडे उपाय करण्यापेक्षा घरीच दर दोन दिवसाआड तेल लावून केस स्वच्छ धुतलेले केव्हाही चांगले. केसगळतीवर उपाय काय ?

केसगळतीवर उपाय करायचे असतील तर कुठेही जाण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या, घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरुन तुम्ही केस गळती कमी करु शकता. 

कोरफड किंवा कडुनिंबाचा रस

कोरफड आणि कडुनिंब हे दोन्ही केसगळती त्वरित कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. कोरफडीमध्ये फॉलिक अॅसिड असते. तसेच व्हिटॅमिन ए, सी, बी१, बी२, बी३ यांचा समावेश असतो. आठवड्यातून दोन वेळा कोरफडीचा रस केसांच्या मुळांना लावल्यास केस घनदाट आणि मजबूत होतात. तसेच कडुनिंबामध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर अॅंटेऑक्सिडंट्स असतात. जे केसांच्या मुळाशी जाऊन असलेला कोंडा कमी नाहीसा करतात. 

बदामाचे तेल 

बदामाचे तेलही केसांसाठी गुणकारी आहे. इतर तेलांपेक्षा हे कमी चिकट असते. केसांना फाटे फुटले असतील तर बदामाच्या तेलामुळे ही समस्या दूर होऊ शकते. तसेच हे तेल केसांसाठी कंडिशनर म्हणूनही उत्तम ठरते.

कांद्याचा रस

कांद्यामध्ये अॅंटीबॅक्टेरियल, अॅंटीफंगल आणि अॅंटीऑक्सिडंट असतात. तसेच कांद्याचा रस मेंदूतील रक्ताभिसरण वाढवतो. केस लांब आणि घनदाट ठेवण्यासाठीही कांद्याचा रस गुणकारी आहे. कांद्याला वास येतो यासाठी कांदा बारिक चिरुन त्याचा रस लावला तर केसगळती कमी होते.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजी