शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

'या' कारणामुळे कमजोर झालं पुरूषांचं हृदय, Heart Attack बाबत रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:54 IST

Heart Attack : एका रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये पुरूषांना हार्ट अटॅकचा धोका जास्त का असतो याचं कारण सांगितलं.

Heart Attack : आजकाल हार्ट अटॅक अनेक भयावह केसेस बघायला मिळतात. ज्यात व्यक्ती चालता-फिरता अचानक पडतो आणि त्याचा जीवही जातो. हार्ट अटॅक येण्याच्या जास्तीत जास्त केसेस पुरूषांमध्ये बघायला मिळतात. एका रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, पुरूषांमध्ये ऑफिसमुळे हार्ट अटॅकचा धोका दुप्पट वाढतो.

जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्या पुरूषांना ऑफिसमध्ये त्यांचं कामाचं कौतुक मिळत नाही, त्यांची स्ट्रेस लेव्हल वाढते. यामुळे घातक हार्ट डिजीजचा धोका दुप्पट होतो. कॅनडाच्या अभ्यासकांनी साधारण 2 दशकापर्यंत स्ट्रेस आणि एफर्ट रिवार्ड इम्बॅलंस (ERI) चा अभ्यास केला. त्यांनी 6, 465 व्हाइट कॉलर जॉब करणाऱ्या पुरूषांवर 18 वर्ष अभ्यास केला. या लोकांना हृदयाचा कोणताही आजार नव्हता. ज्यात 3118 पुरूष आणि 3347 महिलांचा समावेश होता. ज्यांचं सरासरी वय 45 होतं.

ERI आणि नोकरीचा संबंध

Frontiers in Psychology वर असलेल्या एका दुसऱ्या शोधात ERI बाबत विस्तारीतपणे सांगितलं आहे. या स्थितीत कामाशी संबंधित प्रेशर वाढतं, कारण ऑफिसमध्ये त्यांच्या प्रयत्नाना आणि कामाला पुरेसं प्रोत्साहन मिळत नाही. रिसर्चच्या मुख्य लेखकांनी सांगितलं की, अशा वातावरणात कर्मचाऱ्यांकडून हाय क्वालिटी कामाची डिमांड केली जाते. पण कामावर कंट्रोल कमी असतो. त्यांनी या दोन्ही गोष्टीमुळे हृदयावर पडणाऱ्या प्रभावाबाबत अभ्यास केला.

रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या पुरूष सहभागींना तणावपूर्ण वातावरण किंवा कमी कौतुक मिळालं, त्यांच्यात हृदयरोगाचा धोका 49 टक्के वाढला होता. ज्या पुरूषांना स्ट्रेसफुल वर्क आणि ERI या दोन्हीचा सामना करावा लागला, त्यांना हृदयरोगाचा धोका दुप्पट झाला. तर अभ्यासक या गोष्टींचा महिलांवर काय परिणाम झाला हे स्पष्ट करण्यात अपयशी ठरले.

हार्ट अटॅकचा धोका

हार्ट डिजीजमुळे हृदयापर्यंत पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. मुख्य लेखक म्हणाले की, बरेच लोक ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवतात. त्यामुळे हा रिसर्च लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यात फार महत्वाची भूमिका निभावेल. यातून असा निष्कर्ष निघतो की, स्ट्रेसफुल वर्क कंडीशन दूर करून कर्मचाऱ्यांसाठी एक हेल्दी वातावरण बनवलं पाहिजे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाResearchसंशोधनHeart Diseaseहृदयरोग