शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून दूर राहण्यासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 14:48 IST

हिवाळा म्हटले म्हणजे सर्दी, खोकला, घसा खराब होेणे तसेच ताप आदी आजारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या ऋतूत हवेत जास्त आर्द्रता असते. त्यामुळे ८० टक्के संक्रमण हे थेट किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात होते.

-Ravindra Moreहिवाळा म्हटले म्हणजे सर्दी, खोकला, घसा खराब होेणे तसेच ताप आदी आजारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या ऋतूत हवेत जास्त आर्द्रता असते. त्यामुळे ८० टक्के संक्रमण हे थेट किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात होते. एका संशोधनानुसार जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो त्यावेळी श्वास प्रणालीमधील घाण बाहेर पडते, जी की खूप लहान आकारात म्हणजे ५ मायक्रॉनपेक्षा कमी असते. त्यामुळे हवेमध्ये ती लवकर मिसळते. हे कण काहीच वेळ हवेमध्ये टिकतात आणि ३ फुटाच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीच्या श्वास प्रणालीत जाऊन त्याला त्याचे संक्रमण होते. फ्लूमध्ये हे प्रमाण ६ फुटापर्यंत असू शकते. मेनिन्जायटिस, रूबेला ही कणामुळे होणाऱ्या संक्रमणाची उदाहरणे सांगता येतील.ज्या घरांच्या खिडक्या नेहमी उघड्या असतात, त्या घरातील हवा शुद्ध राहते. ज्यामुळे संक्रमण होत नाही. परंतु, ज्या खोल्यामध्ये हवा येत नाही तिथे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. खासकरुन हिवाळा जास्त असल्यावर संक्रमण थांबवण्यासाठी घरातील स्वच्छता महत्वाची असते.कामाच्या ठिकाणी स्प्लिट एसी असेल, तर तिथेही संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ज्यांना क्षयरोग, गोवर, कांजण्या, यांसारखे रोग झाले असतील अशा रुग्णांनी स्प्लिट एसीच्या ठिकाणी बसू नये.६ ते १० फुटांवर असलेल्या व्यक्तीला सुरक्षेची गरज नाही. परंतु, संक्रमित व्यक्तीच्या ३ फुटांपेक्षा जास्त जवळ जात असाल, तर अशा वेळी मास्क घालणे आवश्यक आहे. क्षयरोग, गोवर, कांजण्या, यांसारखे रोग झाले असतील अशा व्यक्तींना आयसोलेशन खोलीत ठेवायला हवे आणि जे त्यांची सुश्रुषा करत असतील त्यांनी एन ९५ मास्क वापरायला हवे. काय काळजी घ्याल* आजारी व्यक्ती किंवा तुम्ही स्वत: आजारी असाल तर दुसºया व्यक्तीच्या जास्त जवळ जाऊ नका.* आजारी असल्यावर घरीच आराम करा आणि दुसºयाला तुमच्या संक्रमणापासून दूर ठेवा. * आपले नाक आणि तोंड झाकून ठेवा. * साबण किंवा अँटीबायोटिकने आपले हाथ स्वच्छ धुवा.* सार्वजनिक ठिकाणी कशालाही स्पर्श करू नका. * स्वत:च्या चेहऱ्याला सारखा हात लावू नका.