शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धुम्रपानापासून राहा दूर आणि मिळवा अधिक सोयी, सवलती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:44 IST

पाश्चात्य देशांत धुम्रपानविरोधासाठी आता नवीन क्लृप्ती..

ठळक मुद्देधुम्रपानविरोधासाठी नवनवीन आयडियांचा वापर.धुम्रपानापासून दूर राहाणाऱ्याना होणार फायदा.लोकांचाही मिळतोय पाठिंबा.

- मयूर पठाडेधुम्रपानाचे काय तोटे आहेत हे आता कोणालाच सांगायला नको. धुम्रपानामुळे अनेक तरुणांचं आयुष्य बरबाद झालं आहे. धुम्रपान हे एकेकाळी फॅशन होती. चित्रपट आणि जाहिरातींत मर्दानी पुरुष म्हणून त्यांचं उदात्तीकरणही केलं जायचं. अलीकडच्या काळात सगळ्यांनाच त्यातला धोका कळल्यानं अनेक देशांत धुम्रपानविरोधांत मोठ्या चळवळी सुरू झाल्या. सरकारी पातळीवरही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. सिगारेटच्या पाकिटांवर वैधानिक इशारा छापणं आणि चित्रपटांतील दृष्यांतही त्याबाबतचा इशार देणं बंधनकारक करण्यात आलं. तरीही त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही.धुम्रपान सोडणं हे अवघड आहे, पण अशक्य नाही, याचं भान सगळ्यांनाच असलं तरी त्याप्रमाणे कृती होत नाही हेदेखील तितकंच खरं आहे. धुम्रपान करणाऱ्यासाठी अलीकडे स्वतंत्र धुम्रपान कक्ष केला जात असला तरी पॅसिव्ह स्मोकिंगमुळे धुम्रपान न करणाऱ्याचं आरोग्यही मोठ्या प्रमाणात धोक्यात येत आहे.धुम्रपानाच्या विरोधात कायदे कडक करण्यात आले, धुम्रपानाच्या साधनांची किंमत वाढवण्यात आली, त्याविरुद्ध जनजागृती करण्यात आली, तरीही धुम्रपान करणाऱ्याची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही हे अनेक देशांचं मोठं दुखणं आहे.त्यामुळे आता अनेक ठिकाणी उलटा विचार सुरू झाला आहे. धुम्रपान करणाऱ्यासाठी कायदे कडक करण्याबरोबरच जे धुम्रपान करीत नाहीत, त्यांना अधिक सोयी आणि सवलती देण्याचा विचार आता सगळीकडेच बळावतो आहे. जपानमध्येही धुम्रपान करणाऱ्याची संख्या खूपच मोठी आहे. पण अशा लोकांमुळे सगळ्यांच्याच आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे तर खरंच, पण त्यामुळे कार्यक्षमताही कमी होते. जपानमधील मियाला या मार्केट फर्मनं यासंदर्भात आपल्या कर्मचाऱ्यासाठी एक नवी प्रोत्साहनपर योजना सुरू केली आहे. जे कर्मचारी धुम्रपान करीत नाहीत, त्यांना वर्षाला सहा अतिरिक्त सुट्या आता देण्यात येणार आहेत. कारण धुम्रपान करणारे धुम्रपानासाठी एकदा बाहेर पडले तरी त्यासाठी त्यात पंधरा मिनिटे वाया जातात. कामाच्या वेळेत पाच वेळेस ते धुम्रपानासाठी गेले तरी तासाभरापेक्षा जास्त काळ वाया जातो. हे लक्षात आल्यानं कंपनीनं धुम्रपान न करणाऱ्याना सुट्यांची सवलत देऊ केली. याचा लगेचंच चांगला परिणाम दिसून आला. धुम्रपान करणाऱ्या काही कर्मचाऱ्यानीही लगोलग आम्हीही धुम्रपान सोडणार असल्याचं जाहीर केलं. अशा प्रयत्नांना आता जगभरात चालना मिळते आहे. आपल्याकडेही अशा योजना यायला आता वेळ लागणार नाही. किमान खासगी क्षेत्रात तरी अशा योजनांमुळे धुम्रपानापासून दूर राहणाऱ्याची संख्या कमी होऊ शकते.