शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाठीचा कणा तुटला; तरीही आता चालता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:16 IST

वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञानाची कमाल

आम्सटरडॅम : बारा वर्षांपूर्वी बाईक अपघातामुळे अपंग झालेले नेदरलँड्सचे गर्ट जॉन ओसकाम (४०) यांना ना चालता येत ना उभे राहता येत होते. मात्र वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामुळे ते आता केवळ चालतच नाहीत तर पायऱ्याही चढू शकतात. वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. हे वायरलेस डिजिटल ब्रिज स्वित्झर्लंडमधील इकोले पॉलिटेक्निक फेडरेल डे लुसाने या संस्थेच्या न्यूरोसायंटिस्ट्सनी विकसित केले आहे. या तंत्राच्या मदतीने मेंदू आणि पाठीचा कणा यांच्यातील तुटलेले कनेक्शन पूर्ववत केले जाऊ शकते.

वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञान मेंदू आणि मणक्याच्या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करते. काही वेळा पाठीच्या कण्याला किंवा मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे दोघांमधील संपर्क तुटतो. त्यामुळे लोकांच्या पायावर उभे राहण्याची आणि चालण्याची ताकद कमी होत आहे.

नेमके काय होते? तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या टीमचे ग्रेगरी कोर्टिने यांनी सांगितले की, मेंदू आणि मणक्याचा संपर्क पुन्हा जोडण्यासाठी आम्ही वायरलेस इंटरफेस तयार केला आहे. त्यासाठी ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. यातून आपल्या विचारांचे कृतीत रूपांतर होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदू पाठीच्या मणक्याच्या भागात संदेश पाठवतो ज्यामुळे आपल्याला हालचाल करता येते.

पाठीच्या कण्यात असतो लहान मेंदूकाही वर्षांपूर्वी, अमेरिकन संशोधकांनी मानवाच्या पाठीच्या कण्यातील लहान मेंदू शोधून काढला होता, तो चालताना संतुलन राखण्यास मदत करतो. चालताना, पायाच्या तळव्यावरील संवेदी अवयव या लहान मेंदूला दाब आणि गतीची माहिती पाठवतात. संशोधकांनी या मेंदूचे वर्णन मानवाचा ‘ब्लॅक बॉक्स’ असे केले होते.