शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:साठी काढा वेळ, नाहीतर तुमची कार्यक्षमता होईल कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:27 IST

दिवसातली किमान काही मिनिटं तरी स्वत:साठी राखून ठेवा, जी फक्त तुमची स्वत:चीच आणि स्वत:साठी असतील..

ठळक मुद्देजबाबदारी अंगावर घेताना त्यासाठी काही प्रायॉरिटी, प्राधान्यक्रम ठरवा.कमी महत्त्वाच्या गोष्टी नंतर करायच्या असं ठरवून काही वेळ स्वत:साठी मोकळा ठेवलाच पाहिजे.सतत वेळेच्या चक्रात अडकलात तर कार्यक्षमता आणि आयुष्यही होईल कमी.

- मयूर पठाडेआपला रोजचा दिवस कसा जातो? सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करतो? कुठल्या गोष्टींत आपला किती वेळ जातो? थोडंसं आपण आपल्याच शेड्यूलकडे पाहिलं तर बºयाच तरुणांच्या, लोकांच्या आयुष्यात पुरेसा वेळच नसतो. त्यांची मुख्य तक्रार तीच असते, की वेळच पुरत नाही.. आहे त्या गोष्टी करता करताच इतका जिव जातो की इतर काही करण्यासाठी काही वेळच पुरत नाही. रात्री झोपायच्या वेळेला तर अंगातलं त्राण जवळपास नाहीसंच झालेलं असतं. फक्त तरुणच नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात सध्या हीच स्थिती आहे. एकामागे एक कामांचा आणि जबाबादºयांचा नुसता भडिमार. बरं या जबाबदाºया टाळूनही चालत नाही..का होतं असं?खरंच यांना वेळ होत नाही, वेळ नाही किंवा वेळेचं व्यवस्थापन त्यांना करता येत नाही?.. वेळेचं व्यवस्थापन तर करायलाच हवं, पण वेळ नसतो हेही खरं, कारण आजकाल प्रत्येकालाच अनेक आघाड्यांवर, तेही एकाच वेळी लढावं लागतं, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीशी लढण्यापेक्षा वेळेशी लढण्यातच त्यांची खूप शक्ती वाया जाते आणि आपल्य हाती वेळच नसल्याचं एक अनामिक टेन्शनही त्यांच्या मानगुटीवर सातत्यानं बसलेलं असतं. वेळ जसजसा पुढे सरकत जातो आणि करायच्या गोष्टींची यादी वाढत जाते, तसतसं अनेकांची अस्वस्थता वाढत जाते. नेमक्या याच गोष्टीय अभ्यसकांनी बोट ठेवलं आहे.अभ्यासकांचं म्हणणं आहे, आपलं शेड्यूल बिझी असण्यात आता तसं काही नवीन नाही, किंबहुना ती आता आपली अपरिहार्य अशी गरज आहे, पण इतक्या साºया जबाबदाºया अंगावर घेताना त्याला काही प्रायॉरिटी, प्राधान्यक्रम निश्चितच असला पाहिजे. कमी महत्त्वाच्या जबाबदाºया नंतर करायच्या असं ठरवून काही वेळ तुमच्यासाठी तुम्ही मोकळा ठेवलाच पाहिजे.असा मोकळा वेळ जर तुमच्याकडे नसला तर तुमची कार्यक्षमता तर कमी होतेच, पण तुमचं आयुष्यही कमी होतं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत नुकताच त्यासंदर्भातील अभ्यास करण्यात आला. त्यामुळे आपल्या वेळेचं नियोजन करा आणि दिवसातली किमान काही मिनिटं तरी केवळ आपल्यासाठी राखून ठेवा. जी वेळ फक्त तुमची आणि तुमचीच असेल...