SMOKING DISADVANTAGE: सिगारेटमुळे लहान मुलांना जन्मत:च येऊ शकतो बहिरेपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 18:12 IST
निकोटिनमुळे ‘आॅडिटोरी बे्रनस्टेम’ या आवाज ऐक ण्यासंबंधित मेंदूच्या भागाचा योग्य तो विकास होत नाही आणि त्यामुळे लहान मुलांना बहिरापणा येऊ शकतो, असा निष्कर्ष एक अध्ययनाअंती संशोधकांनी काढला.
SMOKING DISADVANTAGE: सिगारेटमुळे लहान मुलांना जन्मत:च येऊ शकतो बहिरेपणा
सिगारेटचे दूष्परिणाम सांगावे तितके कमी आहेत. कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या या व्यसनामुळे न केवळ सिगारेट पिणाऱ्यालाच नाही तर त्याच्या आसपासच्या लोकांनाही महाभयंकर परिणाम सोसावे लागू शकतात. लहान मुलांना तर सिगारेटच्या धुरापासून दूरच ठेवलेले बरे अन्यथा त्यांना जन्मत:च बहिरेपणा येऊ शकतो.संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनानुसार, जर लहान मुल पोटात असताना किंवा बाल्यवस्थेत असताना त्याचा सिगारेटमध्ये असणाऱ्या निकोटिन या विषारी द्रव्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला तर त्यांना बहिरेपणा येण्याचा धोका अधिक असतो.►ALSO READ: आपण धुम्रपान करताय? तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्याअभ्यासाअंती संशोधकांनी सांगितले की, निकोटीनचा जर गर्भावस्थेत किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर आईशी संबंध आला तर त्या बाळच्या मेंदूच्या ‘आॅडिटोरी ब्रेनस्टेम’ या आवाज ऐक ण्यासंबंधित भागाचा योग्य तो विकास होत नाही आणि त्याला ऐकू न येण्याचे व्यंग होऊ शकते. ज्या लहान मुलांच्या ‘आॅडिटोरी ब्रेनस्टेम’चा व्यवस्थित विकास झालेला नसतो त्यांना पुढे चालून शिक्षणात आणि विशेष करून भाषाविकासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ‘गर्भवती असताना आईने धुम्रपान केले असेल आणि त्यांच्या मुलांना अभ्यासात जास्त अडचणी येत असतील तर त्यांनी ‘आॅडिटोरी ब्रेनस्टेम’ची तपासणी करण्याचा सल्ला जर्मनीतील ‘फ्री युनिव्हर्सिटी आॅफ बर्लिन’ येथील प्राध्यापिका आणि या संशोधनाच्या प्रमुख उर्सुला कोच यांनी दिला.►ALSO READ: सिगारेट सोडल्यामुळे दारूचे व्यसन होते कमी?‘द जर्नल आॅफ फिजिओलॉजी’मध्ये प्रकाशित या अध्ययनात संशोधकांनी उंदराच्या पिल्लांना जन्माआधी व नंतर तीन आठवड्यापर्यंत आईच्या दुधाद्वारे निकोटिन दिले. अभ्यासाअंती असे दिसून आले की, कानातून आॅडिटोरी ब्रेनस्टेमला संदेश देणाऱ्या न्युरॉन्समध्ये सक्रीयता कमी झाली. तसेच आवाजाचे सिग्नल पाठवताना त्यामध्ये अचुकतेचा अभावदेखील आढळून आला.कोच म्हणाल्या की, ‘आपल्या श्रवण यंत्रणेच्या इतर भागांवर निकोटिनचा कसा परिणाम होते याविषयी अद्याप सखोल माहिती नाही. त्यामुळे याविषयी आणखी संशोधन करण्याची गरज आहे.’ तर मग सिगारेटचे व्यसन स्वत:साठी नाही तर आपल्या प्रियजणांसाठी तरी सोडावे.