शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 13:40 IST

आज संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. विशेषत: रिचार्ज, लाईट बिल, पैसे ट्रान्सफर, सोशल मीडिया, इंटरनेट आदींचा वापरासाठीही स्मार्ट फोनच उपयोगी पडत आहे.

आज संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. विशेषत: रिचार्ज, लाईट बिल, पैसे ट्रान्सफर, सोशल मीडिया, इंटरनेट आदींचा वापरासाठीही स्मार्ट फोनच उपयोगी पडत आहे. मात्र स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्यासाठी घातक असल्याचे निदर्शनास आले आहे. सातत्याने मोबाइलवर गुंतून राहणो शरीर आणि मनाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. शिवाय स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला असल्याचेही म्हटले आहे. याचा सर्वांत अधिक धोका तरुणांना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सतत चार वर्षे दररोज 3क् मिनिटांपेक्षा अधिक वेळ फोनवर बोलल्याने श्रवणशक्ती तर क्षीण होते, तसेच, दृष्टीवरही परिणाम होतो.  3 ते 35 वयोगटातील व्यक्तींनी स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन आदी मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचे प्रमाण 4 % टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर करणा:यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या किरणोत्सर्गाचा परिणाम लहान मुलं आणि तरुणांवर लवकर होतो.     लहान मुलांच्या डोक्याची कवयी अतिशय पातळ असल्याने त्यामधून किरणो सहज आत जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. बहुतांश तरुण इअरफोनचाही जास्त वापर करतात. आपण जर 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाणी ऐकली तर बहिरेपणाला आमंत्रण देण्याचे लक्षण आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.  अधिकाधिक वेळ इंटरनेट सफरिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणा:यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय. मुलामुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा आदी शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात. चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ हेत असून, मोतिबिंदूचे प्रमाण वाढत आहे. सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणा:या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी निर्माण होत आहेत.