SMART TIPS : बॉडी बनविण्यासाठी गरज नाही खूप मेहनतीची, या टिप्सदेखील आहेत महत्वाच्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 13:30 IST
फिट राहण्यासाठी किंवा बॉडी बनविण्यासाठी बरेचजण खूप मेहनत करतात. मात्र यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. जर आपणास चांगली बॉडी बनवायची असेल तर यासाठी एक्झरसाइजसोबत काही गोष्टींकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.
SMART TIPS : बॉडी बनविण्यासाठी गरज नाही खूप मेहनतीची, या टिप्सदेखील आहेत महत्वाच्या !
-Ravindra Moreफिट राहण्यासाठी किंवा बॉडी बनविण्यासाठी बरेचजण खूप मेहनत करतात. मात्र यामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. जर आपणास चांगली बॉडी बनवायची असेल तर यासाठी एक्झरसाइजसोबत काही गोष्टींकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. * फिट राहण्यासाठी एक्झरसाइज तर करावीच मात्र सोबतच एक चांगला डायट प्लॅनही गरजेचा आहे. जर बॉडी बनवायचीच असेल तर आहारात प्रोटीन, मिनरल्स, विटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. * मसल्स बनविण्यासाठी मशीनच्या एक्झरसाइज पेक्षा फ्री वेट एक्झरसाइज अधिक फायदेशीर ठरते. मशीनद्वारे एक्झरसाइज करणे तसे सोपे आहे मात्र फ्री वेट केल्याने आपणास अधिक परिणाम मिळेल. * एक्झरसाइज केल्यानंतर तहान लागणे स्वाभाविक आहे मात्र अशावेळी पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. तसे बॉडी बनविण्यासाठी हायड्रेट असणे गरजेचे आहे. यामुळे आपणास एनर्जीदेखील मिळते. * काही जणांना बॉडी बनविण्याची एवढी घाई असते की, त्यांना पुरेसा आराम करायलासुद्धा वेळ मिळत नाही. अशातच ते आजारी पडतात आणि आरोग्य बिघडवून घेतात. यासाठी पुरेशी झोप आणि आराम करणे गरजेचे आहे.* काही लोक फक्त बॉडी बनविण्याकडे लक्ष देतात मात्र जर आपले वजन वाढलेले असेल तर अगोदर आपला लठ्ठपणा कमी करावा लागेल. यासाठी आपण एक्झरसाइजदेखील करु शकता किंवा काही घरगुती उपायदेखील करु शकता.Also Read : एक मिनिटांचा व्यायामदेखील पुरेसा