शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

Sleep Apnea: झोपेचा हा आजार त्रासदायक आहे, पण आता उपचार झालेत सोपे; जाणून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2025 12:59 IST

दिवसा थकवा जाणवणं, ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये किंवा गाडी चालवताना डुलकी लागणं आणि सतत चिडचिड होणं.. ही लक्षणं दिसल्यास अलर्ट व्हा कारण तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देत आहे.

दिवसा थकवा जाणवणं, ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये किंवा गाडी चालवताना डुलकी लागणं आणि सतत चिडचिड होणं.. ही लक्षणं दिसल्यास अलर्ट व्हा कारण तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देत आहे. (1, 2)  राजेश*सारख्या अनेक लोकांना या लक्षणांनी ग्रासलं होतं, पण नेमका आजार काय हे कोणालाच कळत नव्हतं. अखेरीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (3) केलेल्या स्लीप टेस्टमुळे त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA)असल्याचं निदान झालं.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया या आजारावर CPAP (Continuous Positive Airway Pressure) मशीन हा एक प्रभावी उपचार आहे. (4) मात्र राजेशच्या बाबतीत असं घडलं नाही. राजेशने हे उपकरण पहिल्यांदा वापरून पाहिलं तेव्हा त्या रात्री त्याला क्लॉस्ट्रोफोबिया जाणवला. मास्क त्याच्या त्वचेला चिकटला. रात्रीच्या शांततेत मशीनचा सतत येणारा आवाज त्रासदायक वाटत होता आणि त्यामुळे सतत जाग येत होती. मास्क थोडासा तिरका होता. (5,6,7) सकाळी मास्क काढेपर्यंत राजेश वैतागला होता. (6)

राजेश एकटा नाही. राजेशसारखे लाखो भारतीय OSA सह जगत आहेत. (8) आणि त्यापैकी बऱ्याच जणांना उपचार न केल्यास स्लीप एपनियाचा जे धोके आहेत त्याबद्दल माहिती नाही. यामध्ये हृदयरोग (7), उच्च रक्तदाब (7), दिवसा झोप येणे (2) आणि अपघातांचा धोका देखील वाढतो (2) - आणि शेवटी रुग्ण थेरपी टाळतात किंवा सोडून देतात.

मास्कमागील खरा संघर्ष

असं दिसून आलं की, बरेच लोकांना समान त्रास झाला आहे. (5,6,7)

>> मास्कमुळे अस्वस्थ वाटतं>> हवेचा दाब अनैसर्गिक वाटतो.>> तुमच्या कानाजवळ मशीन वाजवत असल्याने झोप लागत नाही.>> तोंडाला कोरडेपणा जाणवतो. >> त्वचेची जळजळ होते

काही जण पहिल्यांदा मास्क वापरतात आणि तोच शेवटचा असतो. रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, सुमारे १५% लोक फक्त एका रात्रीनंतर CPAP वापरणं थांबवतात. जवळजवळ निम्मे लोक एका वर्षाच्या आत सोडतात. (4) मात्र थेरपी टाळल्याने समस्या दूर होत नाही. खरं तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

उपचार थांबवणं हे उत्तर नाही!

OSA फक्त तुमच्या झोपेवर परिणाम करत नाही, तर जगण्यावरच परिणाम करतं. लक्ष केंद्रीत करण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या क्षमतेपासून ते तुमचे हृदय आणि फुफ्फुस कसं कार्य करतात ते पाहतं. (2,7) दर्जेदार झोप हा चांगल्या आरोग्याचा पाया आहे आणि स्लीप एपनिया असलेल्या लोकांसाठी CPAP सारखी थेरपी जीवन बदलणारी असू शकते.

तुमची श्वसन प्रक्रिया एकसारखी नसते, मग CPAP तसाच का असावा?

रात्री आपला श्वास बदलतो. (11). अत्यंत गाढ झोप, (9), अन्य टप्पे (9), शरीराची स्थिती - हे सर्व आपल्या श्वासोच्छवासावर (12) परिणाम करतात. मग, एक मशीन जे एका विशिष्ट दाबाने सतत हवा देतं, त्याने काहींना अस्वस्थ वाटू शकते. कारण ते तुमचं शरीर नैसर्गिकरित्या जे करत आहे त्याच्याशी जुळवून घेत नाही. तेव्हा नवीन जनरेशनची उपकरणं येतात.

उदाहरणार्थ, फिलिप्स ड्रीमस्टेशन घ्या. ते फक्त हवा पूश करत नाही, ते तुम्ही कसे श्वास घेता हे शिकतं. त्याचा 30-रात्रीचा ऑटो-ट्रायल अल्गोरिथम तुमच्या युनिक पॅटर्नचा मागोवा घेतो आणि त्यानुसार प्रेशर ठरवतं. (13) म्हणून मशीनशी लढण्याऐवजी, तुम्हाला त्याचा आधार वाटतो. EZ-Start फीचर हवेचा दाब हळूवारपणे वाढवतं, ज्यामुळे तुम्हाला अचानक बदल न करता थेरपीमध्ये सहजतेने जाण्यास मदत होते. आणि डिझाइनमुळे हालचाल करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळतं, कारण कोणीही रोबोटसारखे झोपू इच्छित नाही. (14,15,16)

जर पारंपरिक CPAP मशीन तुमच्यासाठी उपयोगाचं ठरलं नसेल, तर आता अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक गरजेनुसार काम करणारे पर्याय उपलब्ध आहेत. ध्येय फक्त मशीन वापरणं नाही; तर चांगली झोप घेणं, सहज श्वास घेणं आणि अधिक चांगलं जीवन जगणं हे आहे. 

आता पुढे काय?

उपचाराची कल्पनाच तुम्हाला अवघड वाटत असल्यामुळे तुम्ही तो टाळला असेल किंवा प्रयत्न करून न झेपल्यामुळे सोडून दिला असेल तर आता या उपचाराकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायची वेळ आली आहे.

असं उपकरण शोधा जे तुमच्याशी जुळवून घेतं. तुमच्या डॉक्टरांशी बोला. इतर पर्यायांविषयी विचारा.

जर तुम्हाला Philips DreamStation कसं काम करतं किंवा ते तुमच्या झोपेसाठी अधिक योग्य ठरू शकतं का, हे जाणून घ्यायचं असेल, तर येथे अधिक माहिती मिळू शकते. 

कारण चांगली झोप मिळवणं हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी थोडं झगडावं लागलं तरी चालेल. कदाचित त्यासाठी तुम्हाला फक्त योग्य साथीदाराची गरज आहे.

*नोट - राजेश हे नाव फक्त उदाहरणासाठी वापरलं आहे. स्लीप एपनिया असलेल्या व्यक्तींच्या सामान्य अनुभवांवर आधारित एक काल्पनिक व्यक्ती आहे.

संदर्भ:1. Jean-Louis G, Zizi F, Clark LT, Brown CD, et al. Obstructive sleep apnea and cardiovascular disease: role of the metabolic syndrome and its components. J Clin Sleep Med. 2008;4(3):261-272.

2. Pinto AM, Devaraj U, Ramachandran P, et al. Obstructive Sleep Apnea in a rural population in South India: Feasibility of health care workers to administer level III sleep study. Lung India. 2018 Jul-Aug;35(4):301-306.

3. Goyal M, Johnson J. Obstructive Sleep Apnea Diagnosis and Management. Mo Med. 2017;114(2):120-124.

4. Rapelli G, Pietrabissa G, Manzoni GM, et al. Improving CPAP Adherence in Adults With Obstructive Sleep Apnea Syndrome: A Scoping Review of Motivational Interventions [published correction appears in Front Psychol. 2023;14:1152441. doi: 10.3389/fpsyg.2023.1152441.]. Front Psychol. 2021;12:705364. 

5. Pinto VL, Sankari A, Sharma S. Continuous Positive Airway Pressure. [Updated 2025 May 3]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2025 Jan-. Available from: https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK482178/

6. Chou MSH, Ting NCH, El-Turk N, et al. Treatment burden experienced by patients with obstructive sleep apnoea using continuous positive airway pressure therapy. PLoS One. 2021;16(6):e0252915. 

7. Catcheside PG. Predictors of continuous positive airway pressure adherence. F1000 Med Rep. 2010;2:70.

8. Suri TM, Ghosh T, Mittal S, Hadda V, Madan K, Mohan A. Systematic review and meta-analysis of the prevalence of obstructive sleep apnea in Indian adults. Sleep Med Rev. 2023;71:101829. 

9. Al Nufaiei ZF, Alluhibi RH, Alsabiti MB, et al. Assessing the Knowledge and Awareness of Obstructive Sleep Apnea among Patient Families in Saudi Arabia: A Qualitative Study. Int J Gen Med. 2024;17:4213-4225.

10. Luyster FS, Dunbar-Jacob J, Aloia MS, Martire LM, Buysse DJ, Strollo PJ. Patient and Partner Experiences With Obstructive Sleep Apnea and CPAP Treatment: A Qualitative Analysis. Behav Sleep Med. 2016;14(1):67-84.

11. Patel AK, Reddy V, Shumway KR, et al. Physiology, Sleep Stages. [Updated 2024 Jan 26]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2025 Jan-. Available from: https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK526132/ 

12. Menon A, Kumar M. Influence of body position on severity of obstructive sleep apnea: a systematic review. ISRN Otolaryngol. 2013;2013:670381. 

13. A veteran’s guide to DreamStation PAP systems. Available from: https://www.philips.com/c-dam/b2bhc/master/landing-pages/experience-catalog/sleep/sleep-solutions-for-your-veterans/philips-respironics-va-dreamstation-sleep-therapy.pdf

14. DreamStation CPAP & BiPAP Therapy Systems. Available from: https://www.philips.co.in/healthcare/product/HCNOCTN447/dreamstation-cpap-bipap-cpap-bi-level-therapy-systems

15. Guide to using your DreamStation CPAP machine and humidifier. Available from: https://www.kch.nhs.uk/wp-content/uploads/2023/01/pl-897.1-guide-to-using-your-dreamstation-cpap-machine-and-humidifier.pdf

16. Dreamstation provider manual. Available from: https://junnimed.com/image/catalog/files/DreamStation%20Provider%20Manual%20International%20English.pdf.

Disclaimer: या लेखात मांडलेली मतं आणि विचार हे संबंधित डॉक्टर किंवा तज्ज्ञ यांचे स्वतंत्र व्यावसायिक मत आहेत. लोकमत त्याच्याशी सहमत आहेच असे नाही किंवा कोणतीही जबाबदारीही स्वीकारत नाही. या माहितीचा वापर वैद्यकीय सल्ला म्हणून करू नये. अधिक माहितीसाठी कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sleep Apnea: Treatment is now easier for this troublesome disorder.

Web Summary : Sleep apnea causes daytime fatigue and health risks. CPAP machines can be uncomfortable, leading to therapy abandonment. Newer devices like Philips DreamStation offer personalized, comfortable treatment for better sleep and health.