आपले शरीर स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आपण आपल्याला जे जमेल ते केले पाहिजे. मग त्यासाठी आपण रोज सकाळी धावायला गेलो तर ते अति उत्तम. तुमच्यापैकी बरेचजण सकाळी धावत असतील. पण रोज धावण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का? असल्यास आम्ही तुम्हाला अशा टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आणखी उत्साहाने धावण्याची इच्छा होईल.रस्ता बदलारोज धावण्याचा तुमचा रस्ता ठरलेला असेल. जी रोजची वाट असेल तर तुम्ही त्यावरच नियमित धावत असाल. आता धावण्याचा रस्ता बदला. एखादे वेगळे ठिकाण निवडा. तिथे धावायला सुरुवात करा. बघा धावणं अधिक इंट्रेस्टिंग होईल.घडाळ्याकडे बघणं विसरातुम्ही घड्याळ लावून सतत धावत असाल तर ते आता करू नका. त्याएवजी तुम्हाला वाटेल तितकावेळ मनसोक्त धावा. घड्याळ लावून धावण्यामध्ये असा तोटा आहे की तुम्ही सतत त्या दडपणाखाली धावता. त्यामुळे धावण्याची मजा निघून जाते.
रोजचं रनिंग इंटरेस्टिंग करण्यासाठी सोप्या टीप्स, रोज म्हणाल, 'भाग मिल्खा भाग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 19:03 IST