सिध्दार्थ जाधव म्हणतो, गेला उडत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 01:56 IST
सिध्दार्थ जाधव आपल्या नव्या अंदाजात गेला उडत! या नाटकाद्वारे पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना हसविण्यासाठी येत आहे.
सिध्दार्थ जाधव म्हणतो, गेला उडत!
विचारात पडलात का? सिध्दार्थ कोणावर चिडला नाही, या कोणत्या कलाकारांशी भांडण देखील झाले नाही तर सिध्दार्थ जाधव आपल्या नव्या अंदाजात गेला उडत! या नाटकाद्वारे पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना हसविण्यासाठी येत आहे. आपल्या अभिनयाची चुनूक सिध्दार्थने यापूर्वी दे धक्का, जत्रा, साडे माडे तीन अशा अनेक मराठी चित्रपटांतून दाखविली आहे. तर यापूर्वी त्याने जागो मोहन प्यारे, लोच्या झाला रे अशा अनेक नाटकमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सिध्दार्थचे हे सहावे नाटक असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सशी संवाद सांगताना सांगितले. तसेच मराठी सिनेमासृष्ट्रीला अंग बाई अरेच्चा २, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा अशी एक से एक चित्रपट देणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांचे गेला उडत! हे नाटक आहे. या तगदया कलाकारांच्या गेला उडत! या नाटकमध्ये अभिनेत्री कोण असणार हे अजून गुलदस्त्यात आहे.नुकतेच या नाटकाचा मुहुर्त करण्यात आला.