शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांनाे, आराेग्य सांभाळा थंडीत हृदयाला जपा ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 10:31 IST

Health : शरीराच्या कुठल्याही एका भागाचे कार्य अचानक बिघडते. साधारणपणे दोन प्रकारचे अर्धांगवायू असतात. पहिला मेंदूच्या विशिष्ट भागात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने होणारा त्यास ‘इस्केमिक स्ट्रोक’ असेही म्हणतात. 

मुंबई :  थंडीच्या दिवसांत जीवनशैलीमध्ये योग्य बदल केल्यास गंभीर आजारांचे धोके तुम्ही सहजरीत्या टाळू शकता. यासाठी नियमित व्यायाम करणे आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीराच्या कुठल्याही एका भागाचे कार्य अचानक बिघडते. साधारणपणे दोन प्रकारचे अर्धांगवायू असतात. पहिला मेंदूच्या विशिष्ट भागात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने होणारा त्यास ‘इस्केमिक स्ट्रोक’ असेही म्हणतात. 

थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढतेदरवर्षी हृदयविकाराचा त्रास असलेल्यांना थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. थंडीमध्ये सकाळच्या वेळी अनेक तरुण आणि ज्येष्ठ मंडळी घराबाहेर पडतात. पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास असलेल्या अनेकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.  

का असतो हृदयविकाराचा धोका ?थंडीत शरीरातील हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. शरीरातील सर्वच वाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयविकाराचा पूर्वी कोणाला त्रास असेल, तर त्यांना या दिवसांत धोक्याचा इशारा असतो. पूर्वीपासून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेज) असल्यास त्यात थंडीत वाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला रक्तपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

...तर धोका टळू शकतोजीवनशैलीत सुधारणा. ४५ मिनिटे रोज चालणे. योगा व ध्यान करणे. वजन नियंत्रित करणे. कमी अंतरासाठी गाड्यांचा वापर टाळणे. लिफ्टचा वापर टाळणे. पायऱ्यांचा वापर करणे असे दैनंदिन बदल केल्यास आपण अर्धांगवायूचा धोका टाळू शकतो.

आहाराकडेही लक्ष द्या! हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा. रोज दहा ते वीस ग्रॅम अक्रोड, बदाम, शेंगदाण्याचे सेवन केल्याने  अर्धांगवायू अथवा हृदय विकाराच्या झटक्याला आळा घालू शकतो. मधुमेह वा रक्तदाब असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधी  घेतली पाहिजेत. आरोग्य तपासणी आवश्यक आहे.

शरीरातील काही द्रव्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयावर ताण येतो. स्वाइन फ्लू किंवा विषाणू जन्य आजारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. सर्दी, खोकल्यामुळेही हृदयावर ताण वाढण्याची शक्यता असते. - डॉ. गंगाराम जगताप, हृदयरोगतज्ज्ञ 

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग