शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सेल्फी काढताय? हा अभ्यास वाचा. अभ्यास म्हणतो ‘सेल्फी म्हणजे फक्त गंमत नव्हे, सेल्फीचा सिरियसली विचार व्हायला हवा!’

By admin | Updated: June 30, 2017 17:48 IST

गॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी केला सेल्फीजचा अभ्यास आणि काही महत्त्वाचे निष्कर्ष जगासमोर आणले

- सारिका पूरकर-गुजराथीकाही दिवसांपूर्वी आपण म्हणत होतो की माणूस आता मोबाईलशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. पण आता माणूस सेल्फीशिवाय जगू शकत नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे. स्मार्ट फोनमधील फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीनं फोटोग्राफीच्या विश्वात क्रांतीच घडवून आणली आहे...सोशल मीडिया, इन्स्ट्राग्राम, व्हॉॅट्सअ‍ॅप प्रोफाईल्स यावर या सेल्फीजनी केव्हाच कब्जा केला आहे. ‘सेल्फी विथ’ मग ती कशाबरोबरही काढली जातेय...सर्वात उंच, धोकादायक टॉवर वर केलेली चढाई असो अथवा चित्रविचित्र वेशभूषा किंवा मग गरोदरपणातील नऊ महिन्यांचा अनुभव.सगळ्यासाठी आणि सगळ्यांसमवेत सेल्फी काढली जातेय.सेल्फीजच्या दुनियेत हजारो आविष्कार सध्या बघायला मिळत आहेत. तर अशा या सेल्फीजच्या माध्यमातून लोकं स्वत:ची ओळख कशी करुन देत आहेत, ते काय सांगताय या सेल्फीजमधून हे जाणून घेण्याचा प्रयत्न गॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी केला. त्याकरिता त्यांनी इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या २.५ दशलक्ष सेल्फीजचा अभ्यास केला.

सेल्फीचा अभ्यास काय सांगतो?*हा अभ्यास करताना १४ प्रकारात सेल्फीजची विभागणी केली होती. यात सर्वात अधिक सेल्फीज कोणत्या प्रकारात आढळतात, सर्वात कमी कोणत्या प्रकारात? असं निरीक्षणही त्यांना नोंदवायचं होतं. आश्चर्याची बाब या अभ्यासात आढळली ती म्हणजे या संशोधकांना १४ प्रकारच्या सेल्फीजची अपेक्षा होती. त्या निकषांवर ५२ टक्के सेल्फीज अयशस्वी ठरल्या. कारण या सेल्फीजमध्ये मेकअप, कपडे, ओठ दाखविणाऱ्या सेल्फीज अधिक होत्या. आपला लूक प्रदर्शित करणाऱ्या सेल्फीजचं प्रमाण या १४ निकषांच्या सेल्फीजपेक्षा दुप्पट होतं. * स्वत:च्या लूक प्रदर्शित करणाऱ्या सेल्फीजनंतर १४ टक्के सेल्फीज या मित्र, नातेवाईक, प्राणी-पक्षी यांच्याबरोबर काढलेल्या होत्या. १३ टक्के सेल्फीज या समधर्मीय, समजातीय लोकांच्या समूहाच्या आणि राष्ट्रीयत्व सांगणाऱ्या होत्या. प्रवासादरम्यान काढलेल्या सेल्फीजचं प्रमाण ७ टक्के होतं . आरोग्य आणि फिटनेससंदर्भातील सेल्फीज ५ टक्के. होत्या * ग्रूपपेक्षा वैयक्तिक सेल्फीजचं प्रमाण अधिक होतं. * इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या एकूण सेल्फीजपैकी ५७ टक्के सेल्फीज या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील नागरिकांनी पोस्ट केलेल्या होत्या. तर १८ वर्षे वयोगटाखालील नागरिकांच्या सेल्फीजचं प्रमाण होतं ३० टक्के. ३५ पेक्षा अधिक वयवर्षे असलेल्या नागरिकांचे सेल्फी पोस्ट करण्याची वारंवारताही कमी म्हणजे १३ टक्के होती.* स्वत:चा लूक, आपण छान दिसतोय ना? ही उत्सुकता हीच एक गोष्ट या सगळ्या सेल्फीजमध्ये कॉमन होती . * याव्यतिरिक्त या सेल्फीजमधील चेहरे खरेखुुरे आहेत का? हे देखील तपासण्यात आले. त्यातही ५० टक्के सेल्फी फेल ठरल्या. काही स्पॅम, ब्लॅन्क इमेजेस होत्या तर काहींनी जास्त फॉलोअर्स मिळावेत म्हणून हॅशटॅगचा वापर केलेला होता. तर असा हा सेल्फीजचा आॅनलाईन केलेला सर्व्हे होता.

 

   * यासंदर्भात प्रसिद्ध लेखिका ज्युलिया डीब- स्विहार्ट यांनी म्हटलंय की सेल्फी खरं तर माणसाच्या व्यक्तिमत्वाची मांडणी करणारी कलाकृती असते. म्हणूनच ती अत्यंत काळजीपूर्वक, कल्पकतेनं साकारायला हवी. सोशल मीडियावर सेल्फीजच्या माध्यमातून लोकं त्यांची संपत्ती, आरोग्य आणि शारीरिक सुंदरता प्रदर्शित करुन त्यांचे व्यक्तिमत्व सादर करतात. सेल्फीतून तुम्ही कसे आहात हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतात तर बघणारा तुम्ही कसे आहात हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. * इर्व्हिंग गॉफमन यांनी ‘सेल्फ इन एव्हरीडे’ लाईफ या पुस्तकात हाच विचार मांडला होता. आपण जे कपडे घालतो, समाजात जसे आपण वावरत असतो हे खरं तर आपणही हुशार आहोत, सुंदर आहोत हे सांगण्याचीच धडपड असते. त्यामुळे सेल्फी देखील तुमचे आॅनलाईन आणि आॅफलाईन व्यक्तिमत्वाची घुसळण असते. तुमच्या आयुष्यातील सत्य काय आहे? हे सिद्ध करण्याचा किंवा लोकांनी हे सत्य आहे यावर विश्वास ठेवावा असं सांगण्याचा तो एक मार्ग आहे असंही ज्युलिया यांनी या अभ्यासात म्हटलय.