शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘जंक फूडमधून लहानग्यांना अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जीचा धोका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:55 IST

लहानग्यांच्या आहारशैलीतून जंकफूडला बाद केले पाहिजे.

मुंबई : लहानग्यांमध्ये जंकफूडची निर्माण होत असलेली आवड ही घातक ठरण्याची शक्यता आहे. जंकफूडचा मुलांचा आग्रह पुरविला गेल्यास व आठवड्यातून त्याचे त्यांच्याकडून तीनदा सेवन झाल्यास लहान मुलांसाठी ते अधिकच हानिकारक ठरणार असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, मायक्रोवेव्ह आणि तळलेल्या पदार्थांचे सातत्याने सेवन केल्यास, त्यातून लहानग्यांना अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जीचा धोकाही संभावतो, असे निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे.

लहानग्यांच्या आहारशैलीतून जंकफूडला बाद केले पाहिजे. अशा पद्धतीच्या पदार्थांमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम होत आहे. अल्पवयीन मुलांनी आठवड्यात तीनदा याचे सेवन केल्यास, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यताही अधिक असते, असे आहारतज्ज्ञ सोनिया शहा यांनी सांगितले. जंकफूडमधील फॅट्समुळे जंकफूडचे व्यसन लागते. हे व्यसन लागल्यानंतर आहारात बदल करणेही अनेकांना कठीण होत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे, तसेच या गोष्टींमुळे सतत खाण्याची इच्छा होते आणि जंक फूड खावे, असेच वाटते. त्यामुळे शरीराला गरज नसतानाही मीठ, साखर आणि फॅट शरीरात जातात. त्यामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचेही संशोधकांनी अहवालात स्पष्ट केले आहे.आहारशैलीत बदल करण्याची गरज-आहारतज्ज्ञआहारतज्ज्ञ डॉ.कल्पिता ननावरे यांनी सांगितले की, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर पोट दुखणे, जुलाब लागणे, अंगावर रॅश येणे, सर्दी, खोकला, धाप, तोच पदार्थ पुन्हा खाल्ल्यावर पुन्हा तीच लक्षणे दिसत असल्यास, त्या अन्नपदाथार्ची अ‍ॅलर्जी असू शकते. गेल्या काही वर्षांत ६ ते १२ वयोगटांतील लहानग्यांमध्ये जंकफूडच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे, ते नियंत्रित केले पाहिजे.