यही सही वक्त है, मराठी इंडस्ट्रीसे रिश्ता बनाना.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 17:32 IST
आता, पुन्हा हा सुपरस्टार गायक रेती या चित्रपटातून आपला आवाज पोहोचविण्यास सज्ज झाला आहे
यही सही वक्त है, मराठी इंडस्ट्रीसे रिश्ता बनाना.
बॉलीवुडचा सुपरस्टार गायक शान याने आपल्या आवाजाने रसिक मायबापांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील शानचा आवाज पोहोचला आहे. आता, पुन्हा हा सुपरस्टार गायक रेती या चित्रपटातून आपला आवाज पोहोचविण्यास सज्ज झाला आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना शान म्हणाला, रेती हा मराठी चित्रपट वास्तव परिस्थीतीशी संबंधित असून समाजाला एक नवीन विचार देणारा हा चित्रपट आहे. बºयाच वेळा सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकरणाची बॅक स्टोरी काय असते हे माहित नसते. यासंबंधित समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा हा चित्रपट असणार आहे. या सामाजिक चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच मला छान मराठी लिहीता, वाचता व स्पष्ट बोलता देखील येते. महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. तसेच मराठी इंडस्ट्री ही भरारी घेत आहे त्यामुळे यही सही वक्त है, मराठी इंडस्ट्रीसे रिश्ता बनाना.