शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन स्त्रियांना सांगतय की सहा महिने स्तनपान कराच, नाही तर बाळाला तरूण वयातच होवू शकतो यकृताचा गंभीर आजार!

By admin | Updated: June 13, 2017 18:50 IST

सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईनं स्तनपान केलं नाही तर बाळाला त्याच्या किशोरअवस्थेतच ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होण्याची दाट शक्यता असते.

 

- माधुरी पेठकर

स्तनपानाच्या महत्त्वाबद्दल गेल्या काही वर्षापासून सतत जनजागृती होत आहेत. आधुनिक विचारसरणी, गतिमान जीवनशैली या कचाट्यात सापडलेल्या कित्येक स्त्रिया मात्र आजही स्तनपानाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. बाळाला संपूर्ण वर्षभर किमान सहा महिने तरी स्तनपान करणं यात फक्त बाळाचाच नव्हे तर स्तनपान करणाऱ्या स्त्रीचाही तेवढाच फायदा होतो. आपली फिगर बिघडेल या भितीपोटी स्तनपान न करणाऱ्या स्त्रियांना हे माहित नसतं की बाळांतपणानंतर स्त्रिला आपल्या पूर्वावस्थेत आणायला स्तनपानच महत्त्वाची भूमिका बजावत असतं. आणि हेच स्तनपान बाळाच्या नुसत्या वाढीलाच नव्हे तर बाळाला पुढे त्याच्या भविष्यात होणाऱ्या आजारापासूनही वाचवतं. स्तनपानासंदर्भात नुकतंच झालेलं संशोधन सांगत की जर सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईनं स्तनपान केलं नाही तर बाळाला त्याच्या किशोरअवस्थेतच ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होण्याची दाट शक्यता असते.

 

                   

संशोधन सांगतं की ज्या आया आपल्या बाळांना सहा महिन्यापेक्षाही कमी स्तनपान करतात आणि सहा महिन्याच्या आतच बाळाला बाहेरचं दूध किंवा पावडरचं दूध पाजतात त्यांना नॉन  अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होतो. आणि तोही अगदी त्यांच्या किशोर वयात. मुळात हा आजार प्रौढ व्यक्तींमध्ये मोठ्या  प्रमाणात पाहायला मिळतो. दर चार पैकी एकाला हा आजार असल्याचं दिसून येतं. यकृतातील पेशींमध्ये चरबीचं प्रमाण वाढलं की यकृत जराही अल्कोहोल पचवू शकत नाही. या आजारात स्थूलपणा प्रचंड वाढतो आणि शरीरातील इन्शुलिन निर्मितीवर हा आजार थेट आक्रमण करतो. संशोधन हेच सांगतं की किशोरवयातील मुला मुलींमध्ये जेव्हा हा आजार आढळून येतो त्याचा थेट संबंध त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेल्या दूधाशी असतो. सहा महिन्यापेक्षाही कमी काळ ज्यांना आईचं दूध मिळालेलं असतं त्यांच्यामध्ये हा आजार होण्याची शक्यता 40 टक्के असते. म्हणूनच अभ्यासक स्त्रियांना संशोधनाचा आधार घेऊन आपल्या बाळांना पूर्ण सहा महिने स्तनपान करण्याचा आग्रह करत आहेत. सहा महिन्याच्या आत मुलांना बाहेरचं दूध आणि पावडरचं दूध न देता आयांनी मुलांना स्तनपानच करावं असं संशोधकांचं म्हणणं आहे.

हे संशोधन असंही सांगतं की ज्या स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या सुरूवातीलाच स्थूलता (ओबेसिटी) असते त्यांच्या मुलांमध्ये किशोरवयात लिव्हरचे आजार होण्याची शक्यता दुप्पट असते. आणि ज्या स्त्रियांचं गरोदरपणाआधी योग्य आणि प्रमाणशीर वजन असतं आणि ज्या स्त्रिया सहा महिने आणि त्यापेक्षा अधिक काळापर्यंत बाळाला व्यवस्थित स्तनपान करतात त्यांच्या मुलांचे यकृत (लिव्हर) पुढे भविष्यातही सुदृढ राहातं.

शिवाय ज्या स्त्रिया गरोदरपणातही धूम्रपान करतात त्यांच्या मुलांमध्ये ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ होण्याचा धोका जास्त असतो. या अभ्यासानं गरोदरपणात स्त्रियांनी स्वत:च्या सुदृढतेकडे आणि बाळांतपणानंतर स्तनपानाकडे विशेष लक्ष पुरवायला सांगितलं आहे. कारण हीच काळजी त्यांच्या मुलांना भविष्यात लिव्हरच्या आजाराच्या मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते.