शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दातांना किड लागू नये यासाठी खास उपाय आला समोर, दातांचं दुखणं होईल सहज दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 10:39 IST

बालपणी आपल्यापैकी अनेकांनी च्युइंगम खाल्ल्यावर आईचा ओरडा खाल्ला असेल. आताही अनेकजण सिगारेट ओढल्यावर किंवा जेवण झाल्यावर च्युइंगम खातात.

बालपणी आपल्यापैकी अनेकांनी च्युइंगम खाल्ल्यावर आईचा ओरडा खाल्ला असेल. आताही अनेकजण सिगारेट ओढल्यावर किंवा जेवण झाल्यावर च्युइंगम खातात. या च्युइंगमचा दातांना कसा फायदा होतो, याबाबत एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळलं की, च्युइंगम चघळल्याने दातांना किड लागत नाही किंवा किड वाढू देत नाही. अभ्यासकांच्या या टीममध्ये एक भारतीय अभ्यासकही आहे. 

(Image Credit : flushinghospital.org)

या रिसर्चचे मुख्य लेखक किंग्स कॉलेज लंडनमध्ये प्राध्यापक असलेले भारतीय वंशाचे अविजीत बॅनर्जी म्हणाले की, लाळेची उत्तेजना ज्या दातांमध्ये किड आहे आणि ज्या दातांना किड नाही अशा दोन्ही दातांसाठी एक नैसर्गिक रक्षक म्हणून काम करते. तर च्युइंगम चघळल्याने एका दातांचं इन्फेक्शन दुसऱ्या दातांमध्ये पसरण्यास रोखतं.

शुगर-फ्री च्युइंगम जॅलिटॉल आणि सोर्बिटॉलसहीत अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्वांना कॅव्हिटीपर्यंत पोहोचवण्याचं कामही करतं. ज्यामुळे एका दाताची किड दुसऱ्या दातांना लागत नाही. अभ्यासक सांगता की, या विश्लेषणाआधी अशाप्रकारचे कोणतेही पुरावे नव्हते, ज्यात किड पसरणे रोखण्यात आणि शुगर फ्री च्युइंगम चघळल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत संबंध दाखवला गेला असेल.

(Image Credit : scitechdaily.com)

या रिसर्चदरम्यान गेल्या ५० वर्षांत प्रकाशित रिसर्चचं विश्लेषण करण्यात आलं. त्यातील १२ रिसर्च शोधून काढले आणि त्यांची तुलना करण्यात आली. ज्यांमध्ये ओरल हेल्थ कंडिशन, शुगर फ्री गम चघळण्याचा प्रभाव आणि कॅव्हिटी वाढण्याची कारणे व्यवस्थि सांगण्यात आले होते. या रिसर्चमध्ये लहान मुलं आणि मोठ्यावर करण्यात आलेल्या रिसर्चचा समावेश करण्यात आला होता.

तुलनात्मक अभ्यासानंतर असं आढळून आलं की, शुगर फ्री गम चघळल्याने किड वाढ रोखण्यात २८ टक्के फायदा एकट्या गम चघळल्याने झाला होता. गेल्या काही वर्षात शुगर फ्री च्युइंगम चघळणे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या रिसर्चबाबत बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, शुगर फ्री गम चघळल्याने दातांची किड रोखण्यात आणि ओरल हेल्थ चांगली ठेवण्यात मदत मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन