शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

Relation : ​पती-पत्नीचे प्रेम निरंतर राहण्यासाठी बेडरुममध्ये ‘या’ गोष्टी आवश्यक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 12:39 IST

आपणही बेडरूममध्ये 'या' गोष्टी करता का?

-Ravindra Moreसध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीच्या प्रेमात दूरावा निर्माण होत आहे. मात्र काही गोष्टींचे पालन केल्यास पती-पत्नींमधील प्रेम आणि शांती कायम राहू शकते. * बेडरूममध्ये तिसऱ्या व्यक्तीची चर्चा नकोचपती-पत्नीचा बेडरूम म्हणजे दोघांचा निवांत क्षण एकत्र घालविण्याचा एक चांगला स्पॉट होय. यावेळी एकांतामध्ये फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसºया व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वत:विषयी चर्चा केल्यास वादाची स्थिती निर्माण होत नाही आणि जवळीकता, प्रेम वाढण्यास मदत होते.  * झालेल्या चुकांवर चर्चा नकोआपल्या पार्टनरकडून भूतकाळात एखादी चूक झाली असेल तर यावेळी ही चर्चा शक्यतो टाळावी. त्या चुकीची वारंवार जाणीव करून देऊ नका. अशावेळी झालेल्या गोष्टींवर चर्चा करीत बसल्यास वाद आणि दु:खच पदरी पडते. यामुळे जुन्या चुकांवर जास्त चर्चा करत न बसता, भविष्याची योग्य मांडणी करावी.* एकाने शांत राहावेसुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जोडीदार संताप करीत असेल तर त्यावेळी दुसऱ्याने शांत राहणे आवश्यक आहे. जर पती-पत्नी दोघेही एकाच वेळी राग व्यक्त करत असेतील तर परिस्थिती बिघडत जाते. रागामध्ये मनुष्याची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टीची निवड करू शकत नाही. यामुळे सर्वात पहिले रागात आलेल्या जोडीदाराला शांत करण्याचा प्रयत्न करावा.* आपले मत प्रेमाने मांडाबऱ्याचदा पती-पत्नी एखाद्या विषयावर वेगवेगळा तर्क मांडतात आणि वाद निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावीत ती म्हणजे, आपली बाजू मांडा परंतु प्रेमाने. आपला तर्क प्रस्तुत करताना आपली भाषा, हावभाव, क्रोध यामध्ये अहंकार असू नये. शांततेत आणि प्रेमाने आपली गोष्ट जोडीदारासमोर ठेवल्यास वादाची स्थितीच निर्माण होणार नाही* पार्टनरचे एकदातरी कौतुक करासर्वांनाच माहिती आहे की स्वत:चे कौतुक ऐकणे प्रत्येकला आवडते, विशेषत: कौतुक जोडीदार करत असेल तर जास्त आनंद प्राप्त होतो. पती-पत्नी दोघांनीही दररोज दिवसातून कमीत कमी एक चांगली गोष्ट एकमेकांबद्दल बोलावी. थोड्याच दिवसांमध्ये याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल आणि प्रेम वाढेल.* तणाव ठेवा दूरअनेकदा काही लोक आॅफिसचा तणाव घरात घेऊन येतात. आॅफिसमध्ये बॉस किंवा इतर कर्मचारीसोबत झालेला वाद किंवा कामातील अपयश. अशा परिस्थितीमध्ये पत्नीने पतीचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. तणावाचे कारण लक्षात घेऊन, तो दूर करण्याचा मार्ग दाखवावा. ही गोष्ट वैवाहिक जीवनात सुख-शांती तसेच प्रेम वाढवेल. Also Read : SEXUAL HEALTH : ​वैवाहिक आयुष्यात ‘बेडरुम’ मॅनर्स हवाच !