रोज आणि नियमित व्यायाम केला तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 20 ते 30 टक्कयांनी कमी होऊ शकतो असा एक अभ्यास जर्मनीत प्रसिद्ध झाला आहे. जर्मन कॅन्सर एड ( डीकेएच) या स्वयंसेवी संस्थेनं केलेला हा अभ्यास आहे. या अभ्यानुसार नियमित व्यायाम करणार्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी आढळतं. एवढंच नव्हे तर कॅन्सर झाल्यानंतर, उपचारांती बर्या झालेल्या महिलांनीही नियमित रोज व्यायाम केला तर पुन्हा आजार होण्याचे, रिकरन्सचे प्रमाणही कमी होते.या संस्थेच्या अभ्यासानुसार व्यायाम महिलांसाठी आवश्यक आहेच, मात्र कॅन्सरसारख्या आजारांची शक्यताही 20 ते 30 टक्कयांनी व्यायामामुळे कमी होते. मॉडर्न ब्रेस्ट कॅन्सर थेरपी अर्थात आधुनिक स्तनकर्करोग उपचारपद्धतीतही व्यायामाचं मोठा भाग आहे. व्यायाम केल्यानं कॅन्सर पेशन्टना येणारा फटीग कमी होतो. उदास कमी वाटतं. केमोथेरपी सुरु असतानाही ज्या महिला नियमित व्यायाम करतात त्यांना केमोचे दुष्परिणामही कमी जाणवतात असं या अभ्यासाचं महत्व आहे.उपचारानंतर पोस्ट थेरपी म्हणूनही नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. याशिवायही महिलांनी नियमित व्यायाम केल्या. नियमित चाचण्या केल्या, आहाराकडे लक्ष दिलं तर कर्करोगासारख्या आजारांवर नियंत्रण शक्य आहे असंही हा अभ्यास म्हणतो.
नियमित व्यायाम केला तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:20 IST
कॅन्सरवर मात करत केमोथेरपी सुरु असतानाही व्यायाम करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला!
नियमित व्यायाम केला तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी!
ठळक मुद्देमहिलांनी नियमित व्यायाम केला तर कॅन्सरचा धोका 20 ते 30 टक्कयांनी कमी होतो!