शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्साही सकाळ देईल तुम्हाला नवचैतन्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:08 IST

झपाटल्यागत पाठी लागलेल्या कामांसाठी एनर्जी मिळवाल कुठून?

ठळक मुद्देदिवसाची सुरुवात कायमच प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची.आपली सकाळ उत्सहावर्धक असेल याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष द्या.संगीतामध्ये आपल्याला रिलॅक्स करण्याची, ताजंतवानं करण्याची शक्ती आहे. त्याचा उपयोग करा.

- मयूर पठाडेकाहीही करा, कामं कितीही झटपट उरकण्याचा प्रयत्न करा, स्वत:त एनर्जी आणण्याचा प्रयत्न करा, पण कामांची यादीच इतकी लांब, की दिवस संपतो, पण कामांची यादी काही संपत नाही.प्रत्येकाची हीच तºहा. कामाची टेन्शन्स, वाढत्या जबाबदाºया, त्या वेळेत पूर्ण करण्याचं बंधन.. वेळ आणायचा तरी कुठून?.. आणि त्यासाठीची एनर्जी?.. माणसानं झटायचं तरी किती आणि किती तास? सकाळी दिवस जो सुरू होतो, तो संपायचं नावच घेत नाही. एकामागे एक झपाटल्यागत कामं उरकत राहायचं.. अर्थात त्याला काही पर्यायही नाही. कामांची आणि जबाबदाºयांची ही वाढती यादी ना टाळता येत, ना एका ठराविक मर्यादेपर्यंत पुढे ढकलता येत. त्यासाठी आपल्यालाच कायम सज्ज राहावं लागतं. आपल्यातली एनजी आपल्याला वाढवावी लागते.कशी वाढवायची ही एनर्जी? कामांसाठी बळ आणायचं कुठून? विशेषत: त्यासाठी जी पॉझिटिव्ह एनर्जी लागते, काहीही झालं तरी निराश न होता, आनंदानं आपलं काम करण्याची जी उर्मी लागते ती मिळवायची कुठून?काही सोप्या गोष्टींनी आपलं हे ध्येय साध्य होऊ शकतं.आपल्या दिवसाची सुरुवात ही कायमच प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची असते. पाहा, ज्या दिवशीची सकाळ आपल्याला उत्साहात जाते, तो दिवसही बºयाचदा आनंदी असतो. त्यामुळे आपली सकाळ खराब होणार नाही, सकाळचा मूड चांगला राहील याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. त्यासाठी मेडिटेशन, ध्यानधारणा यांचाही उपयोग करता येईल.थोडं रिलॅक्स व्हायला शिका. कामाच्या लोंढ्यात स्वत:ला वाहवून घेताना अधूनमधून थोडं थांबा. हे रिलॅक्सेशन तुम्हाला पुढच्या आव्हानांसाठी नवं बळ देऊन जाईल. केवळ टारगेट्सच्या प्रेशरखाली न जगता, वर्तमानात जगायला शिका, हा वर्तमान तुम्हाला बरंच काही देऊन जाईल.आपल्या आयुष्यात संगीताचा उपयोग अवश्य करा. त्यानं आपल्याला ताणतणावांपासूनही मुक्ती मिळेल. संगीतामध्ये आपल्याला रिलॅक्स करण्याची, ताजंतवानं करण्याची शक्ती आहे. आपला मूडही त्यामुळे चांगला होतो. ही चांगली मनस्थिती तुम्हाला कायम वाढीव शक्ती पुरवते. त्याचा सुयोग्य वापर करा.