शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटचे व्यसन सोडायचे? मग घाला ‘नेकलेस’; कसे काम करते? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 10:48 IST

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत व्यसन सोडवण्यास मदत करणारे संशोधन

न्यूयॉर्क : सिगारेटसारखे व्यसन सोडण्याची अनेकांना इच्छा असते, परंतु ते त्यांना शक्य होत नाही. अनेक जण तर कित्येक महिने यशस्वीरीत्या सिगारेट किंवा कोणतेही व्यसन सोडतात, परंतु कालांतराने पुन्हा सुरू करतात. त्यांचा निग्रह कोठे तरी कमी पडतो. सिगारेटचे व्यसन सोडविण्यासाठी आता अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोधलेला ‘स्मार्ट नेकलेस’ (स्मोकमॉन) मदत करू शकतो. 

खरे तर हे गळ्यात घालण्याचे एक उपकरण आहे, ज्यामध्ये निळ्या रंगाचे पेंडंट (लटकन) असते आणि ते घालणारा व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त सिगारेट किंवा इतर गोष्टी घेत असेल तर हे उपकरण तसा इशारा देते. त्यातील पेंडंट सर्वसाधारण परिस्थितीत हलका निळा प्रकाश ते हलका हिरवा प्रकाश सोडते आणि अधिक सिगारेट ओढल्यानंतर ते लालसर निळा प्रकाश सोडते. हे संशोधन १३ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाल्यानंतर त्याबाबत जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुरक्षित ‘स्मोकमॉन’या उपकरणाचे नाव ‘स्मोकमॉन’ आहे. ते धूम्रपान करणाऱ्याच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेते आणि केवळ उष्णतेचा मागोवा घेते दृश्यांचा नाही. यामुळेच हे उपकरण लोकांना परिधान करण्यास सोयीस्कर आणि सुरक्षित बनवते.

किती हानिकारक?सिगारेटमध्ये अतिशय हानिकारक रसायने असतात, जी अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. जगात धूम्रपानाने दरवर्षी ८० लाखांहून अधिक लोकांचा जीव जातो. एकट्या अमेरिकेत दरवर्षी ५ लाखांहून अधिक मृत्यू होतात.

‘स्मोकिंग टोपोग्राफी’चा वापरएखादी व्यक्ती सिगारेटचा झुरका घेते आणि फुप्फुसांत ठेवते तो वेळ तसेच तोंडात सिगारेट किती वेळ ठेवता, या सर्व मोजमापाला स्मोकिंग टोपोग्राफी म्हणतात. ‘स्मोकमॉन’मध्ये या तंत्राचा आधार घेण्यात आला आहे. सेन्सरच्या मदतीने पेंडंट हा सर्व डेटा मिळवून तो साठवून त्याप्रमाणे इशारा देतो.

कसे काम करते?गळ्यात घातलेले हे पेंडंट प्रत्यक्षात सिगारेट ओढल्याने निर्माण होणारी उष्णतेची नोंद घेते. त्यानंतर ते किती सिगारेट ओढल्या जात आहेत व कोणत्या अंतराने ओढल्या जाते हे सांगते. हे उपकरण सिगारेट सोडलेल्या लोकांना पुन्हा सिगारेट पिणे बंद करण्यास मदत करते.

टॅग्स :Smokingधूम्रपान