प्रिया बापटने बनविल्या पुरणपोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 11:31 IST
यंदा ही मी किचनचा कारभार स्वत: हातात घेतला व पुरणपोळया बनविल्या असल्याचे प्रिया बापटने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले
प्रिया बापटने बनविल्या पुरणपोळ्या
आजकालच्या धावत्या युगात माणसांना एकमेकांशी संवाद साधायला देखील वेळ नसतो. त्यामुळे होळी सारखे सणच माणसांना एकत्रित आणण्याचं काम करतात. या उत्साहादिवशी कलर जरी आम्ही खेळत नसलो तरी पुरणपोळयांच जेवण करतो, व नातेवाईक, मित्रमंडळी सर्व एकत्रित येऊन या गोड जेवणाचा आस्वाद घेतो. यंदा ही मी किचनचा कारभार स्वत: हातात घेतला व पुरणपोळया बनविल्या असल्याचे प्रिया बापटने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. चला तर या सुंदर अभिनेत्री प्रिया बापटने बनविलेल्या पुरणपोळया अधिक चविष्ट झाल्या असतील हे नक्की