शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणापेक्षा अकाली टक्कल जास्त घातक, हृदयरोगासाठी कारणीभूत

By अोंकार करंबेळकर | Updated: November 30, 2017 17:01 IST

वयाची चाळीशी येण्यापुर्वी आलेलं टक्कल आणि पांढरे होणारे केस हे लठ्ठपणापेक्षा हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकतात असे एका नव्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे

ठळक मुद्देवयाची चाळीशी येण्यापुर्वी आलेलं टक्कल आणि पांढरे होणारे केस हे लठ्ठपणापेक्षा हृदयरोगाचे लक्षण असू शकते असे एका नव्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे.

लंडन- गेल्या काही वर्षांमध्ये बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी यामुळे हृदयरोग, रक्तदाबात होणारे चढ-उतार आणि मधुमेह हे रोग शहरी जीवनात मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येतात. आता शहरांबरोबर ते ग्रामिण भागातही पोहोचल्याचे दिसून येतात. हृदयरोगाबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध होत असतात. मात्र यावर्षी झालेल्या नव्या संशोधनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वयाची चाळीशी येण्यापुर्वी आलेलं टक्कल आणि पांढरे होणारे केस हे लठ्ठपणापेक्षा हृदयरोगाचे लक्षण असू शकते असे एका नव्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. भारतातील 200 हजार तरुणांची माहिती गोळा केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. टक्कल पडलेले आणि पांढरे केस असणाऱ्या तरुणांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता यावेळेस जास्त दिसून आली. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतातीय कार्डिओलॉजी सोसायटीच्या वार्षिक परिषदेत या संशोधनपत्रिकेचे वाचन होणार आहे.या अभ्यासात कोरोनरी आर्टरी डिसिज असणाऱ्या 790 आणि उत्तम आरोग्य असणाऱ्या 1270 लोकांचा विचार करण्यात आला होता. या 1270 लोकांच्या गटाचा उपयोग कंट्रोल ग्रुप म्हणून करण्यात आला. त्यांच्या आतापर्यंतच्या आरोग्याची माहितीही विचारात घेण्यात आली होती. या सहभागींच्या टक्कल पडण्याच्या व केस पांढऱ्या होण्याच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर मिळालेले निष्कर्ष हृदयरोगाशी त्यांचा संबंध असल्याचे सूचित करत होते.

कंट्रोल ग्रुपपेक्षा 790 लोकांच्या गटातील लोकांना अकाली टक्कल किंवा केस पांढरे होण्याची समस्या 5 पटीने जास्त असल्याचे या अभ्यासात दिसून आले. तसेच हृदयरोग होण्याची शक्यताही कंट्रोल ग्रुपपेक्षा 5.6 पटीने अधिक असल्याचे निरीक्षणांमध्ये दिसून आले.

टॅग्स :Healthआरोग्य