शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाइट शिफ्टवाल्यांच्या झोपेचं काय? कशी काळजी घ्यायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 07:21 IST

कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना, हॉस्पिटलमध्ये काम करणारे  डॉक्टर्स, नर्स यांना नाईट शिफ्ट किंवा रात्रपाळीत तसंच दिवसाच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. अशा बहुतांश लोकांना झोपेचा त्रास असतो. या त्रासालाच ‘शिफ्ट वर्क डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं.

तुमची ‘शिफ्ट ड्युटी’ असते का? म्हणजे कधी नाइट शिफ्ट, कधी सकाळची शिफ्ट, कधी दुपारची शिफ्ट... असं वेगवेगळ्या वेळी तुम्हाला काम करावं लागतं का? विशेषत: कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना, हॉस्पिटलमध्ये काम करणारे  डॉक्टर्स, नर्स यांना नाईट शिफ्ट किंवा रात्रपाळीत तसंच दिवसाच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. अशा बहुतांश लोकांना झोपेचा त्रास असतो. या त्रासालाच ‘शिफ्ट वर्क डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं. कारण यातल्या अनेकांना झोप लागायला खूप वेळ लागतो, नीट झोप लागत नाही,  झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, उठल्यावरही  उत्साह वाटत नाही, पुरेशी झोप न झाल्यामुळे इतरही अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. सतर्कता कमी होते, कामाच्या किंवा इतर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढते, नैराश्य येऊ शकतं, निद्रानाश जडू शकतो, लठ्ठपणा वाढतो, हृदयविकार सुरू होतो, अपचनाच्या तक्रारी सुरू होतात.. याचं कारण जाग आणि झोप याचं जे नैसर्गिक चक्र असतं, तेच अशा शिफ्ट ड्युटीमुळे बिघडतं ..अशावेळी काय करावं? १- दर आठवड्याला शिफ्ट बदलण्याऐवजी ‘मला जास्तीत जास्त काळ एकच कोणतीतरी शिफ्ट द्या’, अशी विनंती तुम्ही तुमच्या कंपनीला करू शकता. त्यामुळे तुमची जाग आणि झोप याचं चक्र त्यातल्या त्यात थोडं सुधारु शकतं.२- शिफ्ट ड्युटी बदलणं, दीर्घ काळ एकच ड्युटी ठेवणं शक्य नसेल, तर निदान आपलं झोपेचं तंत्र तरी सांभाळा. दिवसाच्या कुठल्याही वेळी तुम्हाला झोपावं लागत असेल, तर आपल्या बेडरुममध्ये शक्यतो अंधार असेल, कोणताही व्यत्यय, आवाज, गोंगाट नसेल, याची काळजी घ्या. ३- डोळ्यांवर येणारा प्रकाश कमी असेल, याची काळजी तुम्ही अगदी ऑफिसमधून घरी येतानाही घेऊ शकता. त्यासाठी गॉगलचा वापर करता येईल. ऑफिसमधून घरी आल्यावर शक्यतो ताबडतोब झोपायला जाण्याचा प्रयत्न करा.४- कामावरून घरी आल्यावर गप्पा मारणं, पुन्हा काहीतरी काम करणं, गाणी, मोबाइल, टीव्ही.. या गोष्टी शक्यतो टाळा..५- झोपेच्या वेळा बदललेल्या असल्या, तरी आपल्या जेवणाच्या वेळाही निश्चित करा. वेळी-अवेळी जेवण करणं, फास्ट फूड घेणं टाळा. पूर्ण जेवणावर भर द्या आणि झोपेपूर्वी पोटभर जेवण तर नकोच..