शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोघांनी झुंज देत वाचविले प्राण

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले.

जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले.
केना पावरा व रामसिंग पावरा हे मोरचिडा येथील रहिवासी. जंगलात जाऊन डिंक काढून तो विकणे व आपला तसेच कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा दिनक्रम. नेहमीप्रमाणे ते शनिवारीदेखील जंगलामध्ये डिंक काढायला गेले. त्या वेळी दोघेही वेगवेगळ्या झाडांवरुन डिंक काढत असताना तेथे केना पावरा याच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्या वेळी साधारण २० मीटर अंतरावर असलेल्या रामसिंगने हे दृष्य पाहताच त्याचा थरकाप उडाला. सहकार्‍याला संकटात तर सोडून जायचे नाही, मात्र काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. दगड मारला तर तो केनाला लागेल हीदेखील भीती त्याच्या मनात आली. अखेर रामसिंग थेट पुढे सरसावला व केनाची मदत करु लागला. त्यावेळी बिबट्याने रामसिंगवरदेखील हल्ला केला. मात्र केनानेही तेथून पळ न काढता रामसिंग व त्याने दोघांनी मिळून बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र खवळलेला बिबट्या अधिकच बिथरला. बाजूला असताना तो आपली शेपूट जमिनीवर आपटू लागला घुरघुरू लागला. मागे वळले तर बिबट्या पुन्हा हल्ला करेल या विचाराने दोघांनी पाठ फिरविली नाही. दोघांनी मिळून बिबट्याला हुसकावून लावले व ते माघारी परतले.
दोघांपैकी एकानेही तेथून पळ काढला असता तर कदाचित काय अनर्थ घडला असता हे विचार न केलेलेच बरे, असे जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले.
दुसर्‍यादिवशीही जिल्हा रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू होते.