प्रमोद रायसोनी आयसीयुमध्ये
By admin | Updated: November 7, 2015 22:28 IST
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयु) हलविण्यात आले.
प्रमोद रायसोनी आयसीयुमध्ये
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयु) हलविण्यात आले. शुक्रवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता यांना पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. रात्री त्यांना सामान्य वार्डात ठेवण्यात आले होते. मात्र छातीचा त्रास कायम असल्याने शनिवारी दुपारी त्यांना आयसीयुमध्ये हलविण्यात आले.