प्रमोद रायसोनी जिल्हा रुग्णालयात दाखल
By admin | Updated: November 7, 2015 00:05 IST
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रमोद रायसोनी जिल्हा रुग्णालयात दाखल
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा उपकारागृहात असलेले प्रमोद रायसोनी यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता जिल्हा रुग्णालयात आणले. येथे त्यांचा ई.सी.जी., रक्तदाब तपासण्यात आला. तो नॉर्मल आला. मात्र छातीचा त्रास असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. या बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर चौधरी यांनी सांगितले की, ई.सी.जी., रक्तदाब नॉर्मल असला तरी छातीचा त्रास असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करुन येथेच ठेवण्यात येत आहे.