प्रज्ञा - निधन
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
बबन राहिंज
प्रज्ञा - निधन
बबन राहिंजआळेफाटा : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सेवानिवृत्त शिक्षक बबनराव धोंडिबा राहिंज (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ओझर व संतवाडी येथे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. महाबीजमध्ये काम करणारे प्रकाश राहिंज, रंगदास स्वामी शिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश राहिंज व वसंतराव नाईक पतसंस्था संचालक दिनकर राहिंज यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आळे येथे त्यांच्या अंत्यविधीवेळी अशोक घोलप, राजेंद्र जंगले, भीमाजी गडगे, गोरक्ष उकिरडे, भालेराव, नयना डोके दीपक कुर्हाडे, ज्ञानेश्वर कुर्हाडे, प्रसन्न डोके यांच्यासह सर्व क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. ---------------------------------------- धोंडाबाई मोहिते-पाटील शेलपिंपळगाव : मोहितेवाडी (ता. खेड) येथील धोंडाबाई ज्ञानेश्वर मोहिते-पाटील (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, चार मुली, सुना, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव मोहिते व उद्योजक कैलास मोहिते-पाटील यांच्या त्या मातोश्री होत. फोटो - धोंडाबाई मोहिते - पाटील -----------------------------------बबन शिंदे उरुळी कांचन : बिवरी गावचे ग्रामगुरव बबन कोंडीबा शिंदे (गुरव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बिवारी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव बबन शिंदे (गुरव) यांचे ते वडील होत. ----------------------------------विठाबाई लिमणपुणे : पारवडी (ता. भोर) येथील विठाबाई यशवंत लिमण (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पारवडी येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम लिमण यांच्या त्या मातोश्री होत.----------------------------------------पोपट गोतेराजेवाडी : बिवरी (ता. हवेली) येथील पोपट यशवंत गोते (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुले, तीन पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच सुभाष यशवंत गोते यांचे ते बंधू होत.