प्रज्ञा - निधन :
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
वसंतराव दोरगे-पाटील
प्रज्ञा - निधन :
वसंतराव दोरगे-पाटीलयवत : यवतचे माजी सरपंच व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव यशवंत दोरगे पाटील (वय-८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यवत गावचे सरपंचपद, पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य व पुणे जिल्हा विद्या विकास मंडळावर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. यवत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.ममताबाई गोणते चाकण : सोळबन (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या श्रीमती ममताबाई धोंडीबा गोणते (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ गोणते यांच्या त्या मातोश्री तर संदीप गोणते यांच्या त्या आजी होत. फोटो मेल केला आहे.निधन : कौसल्या हरिंद्रे जेजुरी : येथील कौसल्या बाबुराव हरिंद्रे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेजुरीतील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हरिंद्रे यांच्या त्या पत्नी तर छायाचित्रकार विजयकुमार हरिंद्रे यांच्या त्या मातोश्री होत. फोटो मेल केला आहे.