शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज? - दोघांत काय फरक? तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे?

By admin | Updated: June 1, 2017 17:47 IST

तुम्ही भले दिवसभर बिझी असाल, पण खरंच तुम्ही फिट आहात का? बघा, गडबड करू नका..

- मयूर पठाडेतुम्ही रोज किती फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करता? आणि किती एक्सरसाइज करता? मुळात फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यातला फरक तुम्हाला माहीत आहे का? फिट राहायचं, तर तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे? फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीची कि एक्सरसाइजची?फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यात म्हटला तर बराच फरक आहे आणि म्हटलं तर फार थोडा.. पण आपल्या आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम मात्र बऱ्यापैकी असतो.सोप्या शब्दांत सांगायचं तर फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे आपल्या स्रायुंचं आकुंचन. म्हणजे आपण कोणतीही कृती करीत असतो, तेव्हा होतं ते आपल्या स्रायूंचं आकुंचन. उदाहरणार्थ तुम्ही घरात काही काम करता आहात, घराचे जिने चढता आहात, बागकाम करता आहात, चालता आहात.. ही झाली तुमची फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यातून होतं ते स्रायूंचं आकुंचन.

 

तुम्ही जर दिवसभर नुसतं बसून राहात असाल तर त्यापेक्षा ही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी केव्हाही चांगली. पण तुम्ही म्हणाल, दिवसभर मला घरात मरमर काम असतं, आॅफिसच्या कामासाठी मला खूप वणवण करावी लागते.. माझी फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी भरपूर आहे, मला व्यायामाची एक्सरसाइजची काय गरज?फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज या दोहोंचाही फायदा होतोच, पण त्याच त्याच स्वरुपाच्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमुळे तुम्हाला त्रासही होऊ शकतो. कोणी म्हणेल, मला कंपनीत दिवसभर उभं राहावं लागतं, एखादी स्त्री म्हणेल, दिवसभर स्वयंपाकघरात आणि धुणी-भांडी करण्यातच माझा वेळ जातो. पार थकून जाते मी. या ठिकाणी शारीरिक श्रम आहेत, पण ते एकाच प्रकारचे, त्यामुळे त्याच्या अतिरेकामुळे तुम्हाला त्रासच होऊ शकतो.एक्सरसाइज, व्यायाम म्हणजे अशी कृती, जी तुम्ही ठरवून करता, फिटनेससाठी किंवा आरोग्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायद्यासाठी जाणूनबुजून करता. उदाहरणार्थ जिममध्ये जाणं, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, एखादा खेळ खेळणं.. अशा एक्सरसाइजचा फायदा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीपेक्षा नेहमीच जास्त असतो.लक्षात ठेवा, तुमची फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी किती आहे, केवळ त्यावरच तुमचा फिटनेस अवलंबून नसतो. त्यासाठी खास व्यायामाचीच गरज असते.

 

तीव्रता किती?फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यांची तीव्रता वेगवेगळी असते. कसं ओळखायचं हे?फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करीत असताना सर्वसाधारणपणे आपण सहजपणे बोलूही शकतो. एक्सरसाइज करताना तुम्ही बोलूही शकत असाल तर तुमच्या व्यायामाची तीव्रता साधारणपणे मध्यम स्वरुपाची आहे. पण बोलताना तुम्हाला थांबावं लागत असेल, धाप ;लागत असेल, तर तुमच्या एक्सरसाइजची तीव्रता बऱ्यापैकी जास्त आहे. एक्सरसाइजचे फायदेएक्सरसाइजचे मुख्यत: चार फायदे आहेत.१- तुमच्या हृदयाची शक्ती वाढवणे.२- मसक्युलर स्ट्रेंग्थ वाढवणे.३- एन्ड्यूरन्स (सहनशक्ती) वाढवणे. ४- तुमची फ्लेक्जिबिलिटी (लवचिकता) वाढवणे.या गोष्टी फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीनं साध्य होतीलच असं नाही..