ही आहे परफेक्ट ‘लाईफस्टाईल’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:35 IST
आजच्या धावपळीच्या युगात कुणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही.
ही आहे परफेक्ट ‘लाईफस्टाईल’ !
आजच्या धावपळीच्या युगात कुणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे आजारपण, शारीरिक व्याधी तसेच अकाली म्हातारपण अशा समस्यांना सामोरे जावे लागते. आणि ज्यावेळी ह्या समस्या आपल्याला जडतात त्यावेळी मात्र आपल्या हातातून वेळच निघून गेलेली असते. मात्र योग्यवेळी राहणीमानात सुधारणा करून आपल्या जीवनशैलीत खालील गोष्टी अंगीकारल्या तर नक्कीच आपण कायमस्वरुपी तारुण्याचा अनुभव घ्याल..* अति जागरणामुळे लवकर वार्धक्य येते म्हणून रात्री जास्तीत जास्त उशीर म्हणजे दहा वाजता झोपा.* लवकर उठणे आरोग्यदायी असल्याने सकाळी ५.०० ते ५.३० दरम्यान किंवा त्या आधी उठा.* दात घासण्याआधी एक लिटर गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून प्या.* किमान दहा मिनिटे वज्रासनात बसा.* किमान १० किंवा जास्तीत जास्त २५ सूर्यनमस्कार हळुवारपणे घाला.* प्राणायामाचे अनन्य साधारण महत्त्व असून, फक्त १० मिनिटे करा.* रोज एक आवळा किंवा आवळ्याचा रस आवर्जून घ्या.* सकाळी ८.३० ते ९.०० दरम्यान भरपूर नाष्टा करा. यावेळी जेवण केले तर उत्तमच. * दुुपारी १२.३० ते १.०० दरम्यान हलके जेवण करा. * संध्याकाळी ७.०० ते ७.३० दरम्यान एकदम कमी जेवण.* कंपल्सरी १५ मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे आवश्यक.* १० वाजता एक ग्लास गरम पाणी पिणे आणि लगेच झोपावे. अशी घ्या काळजी * रात्री जेवणानंतर जास्त चालणे टाळावे. फक्त शतपावली करावी. * जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.* रोज कमीत कमी ३ लिटर पाणी प्यावे.* फक्त सीझनल फळेच खावीत.* कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स घेऊ नये. आरोग्यासाठी खूपच घातक आहेत. * डाव्या कुशीवर झोपावे.* सकाळी पाच मिनिटे तरी उन्हात उभे राहावे. * पोट बिघडणार नाही याची काळजी घ्या. कारण पोटाच्या विकारानेच आजारपण येते.