शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

ओमायक्रॉन : ७० वेळा अधिक वेगाने पुनरुत्पत्ती, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 06:30 IST

Omicron Variant : ओमायक्रॉन हा स्वत: कमी घातक आहे का? अतिरिक्त डोससह लसीकरणयुक्त गंभीर आजार असलेले लोक यापासून सुरक्षित आहेत का? याचे प्रत्येकाला उत्तर हवे आहे.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून आपण ओमायक्रॉनच्या भीतीखाली जगत आहोत. ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत असला तरी तो उग्र किंवा घातक नाही, ही सर्वांत चांगली बाब आहे. ओमायक्रॉनमुळे जगात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. त्या सर्वांचे लसीकरण झालेले नव्हते. यावर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.

ओमायक्रॉन हा स्वत: कमी घातक आहे का? अतिरिक्त डोससह लसीकरणयुक्त गंभीर आजार असलेले लोक यापासून सुरक्षित आहेत का? याचे प्रत्येकाला उत्तर हवे आहे. प्रत्येकाला माहिती आहे की, नोव्हल ओमायक्रॉन व्हेरिएंट हा मूळ सार्स-सीओव्ही-२ आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त वेगाने पसरतो. एकदा संक्रमण झाल्यानंतर २४ तासांत मूळ सार्स-सीओव्ही-२ आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनची ७० वेळा अधिक वेगाने पुनरुत्पत्ती होते.

त्याच्या विपरीत तो ओमायक्रॉन कमी प्रभावीपणे (१० वेळापेक्षा कमी) मानवी फुफ्फुसाच्या उतींमध्ये पुनरुत्पत्तीत होतो. त्यामुळे रोगाच्या कमी गंभीरतेचे संकेत देतो. उत्परिवर्तनांमुळे तो प्रतिकारशक्तीला जुमानत नाही. त्यामुळे मोनोक्लोनल अँटिबॉडीज काम करीत नाहीत. याला अपवाद आहे तो जीएसकेने विकसित केलेल्या सोट्रोविमॅबचा आहे.

अलीकडच्या संशोधनाच्या निष्कर्षावर एक नजर इम्पेरियल कॉलेज लंडनमधील संशोधकांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉनमध्ये डेल्टाच्या तुलनेत गंभीरतेच्या बाबतीत कमी बदल झाले. वय, आरोग्य स्थिती, पूर्वीचे संक्रमण व लसीकरणाची स्थिती नियंत्रण केल्यास ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत ११ टक्के कमी गंभीर आजार निर्माण करू शकतो.ओमायक्रॉनबाबत सीडी४टी पेशींमध्ये सातत्याने घट होते. परंतु ७० टक्के प्रतिक्रिया संरक्षित आहे.डिस्कव्हरी हेल्थ या दक्षिण आफ्रिकेच्या सर्वांत मोठ्या खासगी आरोग्य विमा प्रशासकांनी केलेल्या विश्लेषणानुसार, फायझर लसीचे दोन डोस ओमायक्रॉनपासून रुग्णालयात भरती होण्यापासून रोखण्यात ७० टक्के प्रभावी आहे. तसेच ओमायक्रॉनचे संक्रमण रोखण्यास ३३ टक्के प्रभावी आहे.ब्रिटनमधील आरोग्य सुरक्षा संस्थेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात म्हटले आहे की, बुस्टर डोसमुळे ७० ते ७५ टक्के लक्षणात्मक आजारांपासून संरक्षण मिळण्याची शक्यता वाढते.

अंतिम निष्कर्ष     ओमायक्रॉन सध्याही उच्च संक्रामक आहे. अमेरिकेत त्याचे रुग्ण दोन किंवा तीन दिवसांत दुप्पट होत आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तो जेवढा वाढायचा तेवढाच वाढतो.-त्याच्यापेक्षा त्याचा व्हेरिएंट हलका असला तरी सर्वसामान्य सर्दी म्हणून ओमायक्रॉनकडे पाहणे घाईचे ठरेल.    लोकसंख्या आणि गर्दीची ठिकाणे नियंत्रणाबाहेर असलेल्या भारतासारख्या देशात १००पैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत असली तरी अंतिम संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या