शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉन BF.7 व्हेरिएंटच्या एका रुग्णापासून 18 लोकांपर्यंत पसरतो व्हायरस; जाणून घ्या सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 21:03 IST

डॉक्टरांच्या मते, हा सब व्हेरिएंटओमायक्रॉनचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट लसीद्वारे तयार झालेल्या इम्युनिटीला देखील बायपास करतो.

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने रुग्णालयांमध्ये वाढत आहे. दररोज शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट bf.7 हे चीनमधील वाढत्या प्रकरणांचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग दर खूप जास्त आहे. डॉक्टरांच्या मते, हा सब व्हेरिएंटओमायक्रॉनचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट लसीद्वारे तयार झालेल्या इम्युनिटीला देखील बायपास करतो. भारतातही कोरोनाच्या bf.7 व्हेरिएंटची  4 प्रकरणे समोर आली आहेत.

ओमायक्रॉन bf.7 व्हेरिएंटमध्ये पुन्हा संसर्ग (रिइन्फेक्शन) होण्याचा धोका देखील आहे. या व्हेरिएंटची आर व्हॅल्यू म्हणजेच रिप्रोडक्शन संख्या 18 आहे. याचा अर्थ या व्हेरिएंटच्या संक्रमित रुग्णाच्या संपर्कात येऊन 18 लोकांमध्ये कोरोना पसरू शकतो. यामुळेच चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज येथील प्रकरणे दुप्पट वेगाने वाढत आहेत. मात्र, हे गरजेचे नाही की व्हेरिएंटची आर व्हॅल्यू नेहमी सारखेच असली पाहिजे. ज्या भागात हा व्हेरिएंट पसरत आहे, त्या भागात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, यावर ते अवलंबून आहे.

या संदर्भात डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की, कोरोनाच्या इतर व्हेरिएंटची आर व्हॅल्यू 5 पेक्षा कमी आहे. आतापर्यंत भारतात आलेल्या सर्वात धोकादायक व्हेरिएंट डेल्टाची आर व्हॅल्यू सुरुवातीला 1 होती, नंतर ती 2 पर्यंत वाढली होती, म्हणजे डेल्टाचा संसर्ग झाल्यास 3 लोकांमध्ये हा व्हायरस पसरू शकतो. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, डेल्टाचे आर व्हॅल्यू 3 होते, परंतु ते यापेक्षा जास्त झाले नाही. जेव्हा व्हायरसचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हा आर व्हॅल्यू कमी होऊन 1 पेक्षा कमी झाली. याशिवाय, अल्फा आणि लॅम्बडा व्हेरिएंटची आर व्हॅल्यू कधीही एकापेक्षा जास्त झाली नाही. हे व्हेरिएंट काही महिन्यांतच कमकुवत झाले होते.

ओमायक्रॉनच्या इतर व्हेरिएंटचे आर व्हॅल्यू पाच पेक्षा जास्त नाही दरम्यान, ओमायक्रॉनचे bf.7 व्हेरिएंट सोडून कोणत्याही व्हेरिएंटचे आर व्हॅल्यू पाच पेक्षा जास्त नाही आहे. ओमायक्रॉन bf.7 वेगाने पसरत आहे, कारण त्याचा रिप्रोडक्शन नंबर अधिक आहे, परंतु हे गरजेच नाही की, या व्हेरिएंटचा एक संक्रमित 18 लोकांमध्ये व्हायरस प्रसारित करेल. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या प्रतिकारशक्तीवर आणि त्यांना आधी नैसर्गिक संसर्ग झाला होता की नाही यावरही हे अवलंबून असते.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या