शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​‘या’ ७ वर्षीय बालकाचे आहेत ‘8 pack abs’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 10:55 IST

सध्या एका चीनच्या मुलाने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ७ वर्षीय बालकाचे ‘एट पॅक एब्स’ पाहून मोठमोठे बॉडी बिल्डर्स आणि सेलिब्रिटीदेखील चकित झाले आहेत.

-रवींद्र मोरे बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये आपण काही सेलेब्सचे सिक्स पॅक पाहत असतो. सिक्स पॅक बनविण्यासाठी सेलेब्स खूप मेहनत घेत असतात. त्यासाठी ते आहाराबरोबरच नियमित व्यायामदेखील करीत असतात. मात्र ‘सिक्स पॅक एब्स’ आणि ‘एट पॅक्स एब्स’ बनविण्यासाठी आम्ही एका ठराविक वयाची वाट पाहत असतो. मात्र जगातील काही देशांमध्ये असे नाही. यात चीनचाही समावेश आहे. चीनमध्ये लहानपणापासूनच मुलांना आॅलंपिक खेळांसाठी तयार केले जाते आणि त्यानुसार तेथील बालके तशी काळजीही घेतात. सध्या अशाच एका चीनच्या मुलाने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ७ वर्षीय बालकाचे ‘एट पॅक एब्स’ पाहून मोठमोठे बॉडी बिल्डर्स आणि सेलिब्रिटीदेखील चकित झाले आहेत. या जिम्नास्ट बालकाचे नाव चेन असून एवढ्या कमी वयातच त्याने खूप प्रसिद्धी मिळविली आहे. नुकतेच त्याने एका जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहा गोल्ड आणि एक सिल्वर मेडल मिळविले. ‘पीपल्स डेली चायना’ने फेसबुकवर या बालकाचे काही फोटो पोस्ट केले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अवघ्या दोन दिवसातच या फोटोंना सुमारे ३४ हजार लोकांनी लाइक केले तर ७०० लोकांनी शेअरदेखील केले आहेत. शिवाय या फोटोंवर कमेंट्स पण वाढतच आहेत. ‘पीपल्स डेली चायना’नुसार चेन जेव्हा फक्त पाच वर्षाचा होता, तेव्हापासून त्याला एका व्यावसायिक जिम्नॅस्टसारखे प्रशिक्षित केले जात आहे. चेन जेव्हा केजीमध्ये शिकत होता, तेव्हापासून त्याचे धैर्य आणि स्फु र्ती पाहून त्याची जिम्नॅस्टिकसाठी निवड केली गेली. चेनच्या कोचने सांगितले की, तो शिक्षणाबरोबरच आपल्या ट्रेनिंगवर विशेष लक्ष देत असतो.