शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थूल व्यक्तींमध्ये स्लीप ॲप्नियाचे २० टक्के प्रमाण; घोरणाऱ्या व्यक्तीला होतो आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:44 IST

रात्री श्वास घेताना सतत त्रास होतो. हा आजार वृद्ध पुरुषांमध्ये आढळतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांना हा आजार होण्याची शक्यता वाढते.

मुंबई : घोरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्लीप ॲप्निया आजार असतो असे नाही. मात्र सामान्य वजन असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण तीन टक्के, तर स्थूल व्यक्तींमध्ये हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे निधन ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाने झाले. यानिमित्ताने आजाराविषयी अधिक माहिती देताना तज्ज्ञ डॉ. प्रशांत छाजेद म्हणाले की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया किंवा ओएसए हा आजार झोपेदरम्यान वरच्या श्वसननलिकेमध्ये वारंवार येणाऱ्या अडथळ्यामुळे होतो. हा झोपेशी संबंधित श्वसनविषयक आजार आहे. जीभ, घसा यामधील मऊ ऊती व टाळूला आधार देणारे स्नायू शिथिल होतात. रात्री श्वास घेताना सतत त्रास होतो. हा आजार वृद्ध पुरुषांमध्ये आढळतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांना हा आजार होण्याची शक्यता वाढते.

जीवनशैलीत बदल गरजेचेवेळेवर निदान किंवा उपचार झाला नाही तर आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. या आजाराच्या सौम्य केसेससाठी उपचाराकरिता जीवनशैलीमध्ये बदल पुरेसे ठरू शकतात. यात व्यायाम, वजन कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे. विशेषत: झोपण्यापूर्वी मद्यपान, ॲण्टिॲन्क्झायटी औषधे व इतर शामक पदार्थ टाळणे गरजेचे आहे. मध्यम ते गंभीर स्लीप ॲप्नियाचे पीडित व्यक्तींसाठी विविध उपचार आहेत. आजाराच्या निदानासाठी रात्रभर पॉलिसोमेनोग्राफी चाचणी केली जाते.

काय होतो त्रास?

या आजाराचे अनेक प्रकार आहेत, पण यात सर्वात महत्वाचा  ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया हा आहे. यात घशातील स्नायू अधूनमधून शिथिल होतात आणि झोपेत श्वसननलिकेमध्ये अडथळा होतो. जोरजोरात घोरणे, झोपेदरम्यान धाप लागणे, जाग आल्यानंतर तोंड कोरडे असणे, सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी व निद्रानाश ही लक्षणे आहेत, अशी माहिती स्लीप मेडिसीन तज्ज्ञ. अंशू पंजाबी यांनी दिली आहे.

या आजाराचे अनेक प्रकार आहेत, पण यात सर्वात महत्वाचा  ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया हा आहे. यात घशातील स्नायू अधूनमधून शिथिल होतात आणि झोपेत श्वसननलिकेमध्ये अडथळा होतो. जोरजोरात घोरणे, झोपेदरम्यान धाप लागणे, जाग आल्यानंतर तोंड कोरडे असणे, सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी व निद्रानाश ही लक्षणे आहेत, अशी माहिती स्लीप मेडिसीन तज्ज्ञ. अंशू पंजाबी यांनी दिली आहे.