आता, मराठीत ही पेज फोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 17:59 IST
आश्चर्य वाटून नका घेऊ कारण मराठीत जरी पेज फोर येत असला तरी त्याचा बॉलीवुडच्या पेज थ्रीशी काही संबंध नसल्याचे अभिनेता निखिल राउत याने लेकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. निखिल म्हणाला, ही चार मित्रांची कहानी आहे.
आता, मराठीत ही पेज फोर
आश्चर्य वाटून नका घेऊ कारण मराठीत जरी पेज फोर येत असला तरी त्याचा बॉलीवुडच्या पेज थ्रीशी काही संबंध नसल्याचे अभिनेता निखिल राउत याने लेकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. निखिल म्हणाला, ही चार मित्रांची कहानी आहे. समाजात घडणाºया घटनांवर हा चित्रपट आहे. समाजात घडणारे कृत्य व त्याचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम हा पेज फोर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे.जयदीप येवले, परितोष प्रधान,क्षितीज कुलकर्णी दिग्दर्शित पेज फोर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईन. तसेच या चित्रपटात निखिल राऊत, सौरभ गोखले, ओकांर गोवर्धन, गिरीश परदेशी हे कलाकार मुख्य भुमिकेत असणार आहेत. तर याव्यतिरिक्त मधुरा वेलणकर, विभावरी देशपांडे, गौतमी देशपांडे, केतकी नारायण, दिप्ती यांचा देखील या चित्रपटात समावेश आहे.