शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

फक्त तरुणच नव्हे, तरुणींमध्येही चढतेय अति व्यायामाची नशा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 5:50 PM

‘पी हळद अन् हो गोरी!’, या प्रकारात आरोग्याचे वाजतात तीन-तेरा!

ठळक मुद्देअति व्यायामामुळे तरुणी आणि महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचा बॅलन्स बिघडतो.त्यांच्या मासिक पाळीचं चक्र बिघडतं.मासिक पाळीचं हे चक्र बंदही पडू शकतं.

- मयूर पठाडेफक्त तरुण आणि त्यातही मुलंच व्यायाम करतात, त्यातल्या अनेकांना व्यायामाची ‘नशा’ असते असं नाही. बारीक, सडपातळ होण्याच्या आणि वेट लॉस करण्याच्या हव्यासापोटी अनेक तरुणी आणि महिलाही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात. लवकरात लवकर आपली फिगर मेन्टेन करणं हा सोस तर त्यामागे असतोच, पण त्यामुळेच आपण सुंदर दिसतो असंही त्यांना वाटत असतं.स्त्री असो वा पुरुष, अतिरेकी व्यायामाचा सगळ्यात पहिला फटका बसतो तो हृदयावर. त्यामुळे हृदयावर अतिरेकी ताण येतो. कित्येकदा हा ताण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असतो आणि त्याचा दुष्परिणाम थेट अकस्मात मृत्यूतही होऊ शकतो.त्यातही समजा तुम्ही खूप व्यायाम करताहात, पण तुमचा आहार जर कमी असला, कॅलरी इनटेक खूपचं कमी असलं तर त्याचा आणखीच वाईट परिणाम होतो. विशेषत: स्त्रियांमध्ये दुहेरी दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे एकीकडे खूप व्यायाम करायचा आणि दुसरीकडे डाएट करायचा, आपलं वजन मिलिग्रॅमनंही वाढू नये याबाबत अतिरेकी दक्षता घ्यायची, त्यामुळे दुखणी विकोपाला जाऊ शकतात आणि आपल्या आरोग्याचे तीन-तेरा वाजू शकतात.जेव्हा सातत्यानं तुम्हाला दुखणं जाणवत असेल, गरजेपेक्षा जास्त काळ आणि जास्त प्रमाणात तुमचं अंग दुखत असेल, तर तिथे थोडा वेळ थांबा आणि विचार करा. आपल्या वर्कआऊट रुटिनचं विश्लेषण करा. कदाचित तुम्ही जरा ‘अति’च करत असाल.अनेक तरुणींना तर याचं इतकं आॅब्सेशन चढतं की ‘पी हळद अन् हो गोरी!’कमी काळात जास्तीत जास्त व्यायामाचा सपाटा त्या लावतात आणि आपल्या आरोग्याचं वाटोळं करून घेतात. अति व्ययामामुळे दुखापतींचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतं.अति व्यायामामुळे तरुणी आणि महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचा बॅलन्स बिघडतो.त्यांच्या मासिक पाळीचं चक्र बिघडतं.कधी कधी मासिक पाळीचं हे चक्र बंदही पडू शकतं.अकालीच हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं.प्रचंड प्रमाणात थकवा जाणतो आणि शरीरातील एनर्जीही कमी होते.